Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूरला स्वत:चा मुलगाच मानते त्याची सावत्र आई, अभिनेत्री म्हणते, "त्याच्या मुलांबरोबर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 11:01 IST

शाहिद कपूर आणि सावत्र आईचं नातं कसं आहे? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाल्या...

शाहिद कपूर हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. 'कबीर सिंग', 'जब वी मेट', 'पद्मावत', 'जर्सी', 'विवाह' अशा सुपरहिट चित्रपटांतून शाहिदने प्रेक्षकांना भुरळ घातली. अभिनयातील करिअरबरोबरच शाहिद त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहिदची आई निलीमा अझीम आणि वडील पंकज कपूरही सुप्रसिद्ध कलाकार आहेत. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतच शाहिदनेही बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. 

निलीमा अझीम आणि पंकज कपूर यांनी १९७९मध्ये लग्नगाठ बांधली. पण, शाहिदच्या जन्मानंतर खटके उडाल्याने ते १९८४मध्ये घटस्फोट घेत वेगळे झाले. त्यानंतर पंकज कपूर यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठकबरोबर दुसरा विवाह केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुप्रिया यांनी शाहिदबरोबरच्या त्यांच्या नात्याबाबत भाष्य केलं. शाहिदच्या मुलांबरोबर कसं नातं आहे, याचा खुलासाही त्यांनी या मुलाखतीत केला. त्या म्हणाल्या, "शाहिद माझा मुलगा आहे आणि त्याची मुलं ही माझी नातवंडे आहेत. माझ्या दोन्ही नातवडांबरोबर माझं चांगलं रिलेशन आहे."

"एक कुटुंब म्हणून आमच्यातील नातं घट्ट करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. आम्ही कौटुंबिक आहोत. त्यामुळे एकत्र राहण्यावर आमचा विश्वास आहे. जसजशा पिढ्या बदलतात तसं कुटुंबातील नातंही अधिक दृढ होतं, असं मला वाटतं. माझं माझ्या मुलीबरोबर मैत्रिणीचं नातं आहे," असंही त्यांनी पुढे सांगितलं. 

दरम्यान, सुप्रिया पाठक या त्यांच्या आगामी 'खिचडी २' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केलं आहे. 'खिचडी' या मालिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत त्यांनी हंसा हे पात्र साकारलं होतं. 

टॅग्स :शाहिद कपूरसेलिब्रिटी