Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूरला आजही आहे 'त्या' गोष्टीचा पश्चाताप, स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 16:22 IST

शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या शाहिद या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे

ठळक मुद्देशाहिद कपूरला सिद्धार्थचा रोल ऑफर करण्यात आला होताराकेश ओमप्रकाश मेहराने या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते

शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या शाहिद या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदने त्याला आमीर खानचा सिनेमा रिजेक्ट केल्याचा पश्चाताप आहे.  

आमिर खानचा सुपरहिट सिनेमा 'रंग दे बसंती'मध्ये शाहिद कपूरला सिद्धार्थचा रोल ऑफर करण्यात आला होता. सिद्धार्थने सिनेमात करण सिंघानियाची भूमिका साकारली होती. त्यावेळी शाहिदने ही भूमिका नाकारली होती. राकेश ओमप्रकाश मेहराने या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. 2006मधला सगळ्यात सुपरहिट सिनेमा ठरला होता. या सिनेमाने अनेक अॅवॉर्ड्स आपल्या नावावर केले होते.   

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या तेलगू सिनेमाचा हा अधिकृत हिंदी रिमेक आहे. विजय देवरकोंडा स्टारर ‘अर्जुन रेड्डी’ हा सिनेमा सुपरहिट झाला आणि आता हाच सिनेमा ‘कबीर सिंग’ नावाने प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 21 जूनला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

स्वभावाने अतिशय रागीट, शीर्घकोपी असलेल्या या कबीरचा पुढे प्रेमभंग होतो आणि तो दारुच्या आहारी जातो, अशी थोडक्यात या सिनेमाची कथा आहे.  संदीप वांगा दिग्दर्शित या सिनेमात शाहिद कपूरसह कियारा अडवाणी, सुरेश ओबेरॉय आणि अर्जुन बाजवा यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :शाहिद कपूरआमिर खान