Join us

महारावल रतन सिंहच्या लूकसाठी शाहिद कपूरने वाढवलं मस्क्युलर वजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 14:47 IST

आकर्षक चेहरा आणि पिळदार बॉडी असलेल्या अभिनेत्यांची हिंदी चित्रपटसृष्टीत काही कमी नाही. मात्र अशा कोणत्याही गोष्टी नसतानाही आपल्यात असलेल्या ...

आकर्षक चेहरा आणि पिळदार बॉडी असलेल्या अभिनेत्यांची हिंदी चित्रपटसृष्टीत काही कमी नाही. मात्र अशा कोणत्याही गोष्टी नसतानाही आपल्यात असलेल्या अभिनयाच्या कलेनं आणि व्यक्तीमत्वामुळं रसिकांच्या घरात स्थान मिळवणारे मोजके कलाकार हिंदी सिनेसृष्टीत आहेत. त्यापैकी आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेता म्हणजे शाहिद कपूर.आपल्या अभिनय सामर्थ्यामुळं त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलंय.‘पद्मावती’ सिनेमात महाराणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणा-या दीपिका पादुकोणचा लूक पाहिला. महाराणी पद्मावतीच्या पाठोपाठ आता महारावल रतन सिंह अर्थात ही भूमिका साकारणा-या शाहिद कपूरचा लूकचीही जोददार चर्चा होत आहे.संजय लीला भन्सांलींच्या पद्मावती सिनेमात‘साहस, सामर्थ्य आणि सन्मान’चे प्रतिक असलेल्या महारावल रतन सिंहच्या भूमिकेत अभिनेता शाहिद कपूर झळकणार आहे.शाहिदने आपल्या ह्या सिनेमातल्या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतलेली आहे. सिनेमाच्या टीमने महारावल रतन सिंहच्या भूमिकेवर बारकाईने अभ्यास केलाच आहे. त्यासोबतच आपल्या प्रत्येक भूमिका विचारपूर्वक साकारणा-या शाहिदनेही महारावल रतन सिंहच्या प्रत्येक पैलूचा अभ्यास केला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, “एका राजाची भूमिका साकारायची म्हणजे त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचाच विचार करावा लागतो. पूर्वीचे राजे-रजवाडे हे युध्दावर जाय़चेय त्यामूळे त्यांची शरीरयष्टी सूध्दा त्याला अनुरूप असायची. ते बारीक नव्हते. त्यामूळे शाहिदला आपलं वजन वाढवण्यापेक्षा आपलं शरीरयष्टी पिळदार करण्यावर भर द्यावा लागला.”सूत्रांनूसार, “संजय लीला भन्साली आपल्या ऐतिहासिक भूमिकांवर खूप जाणीवपूर्वक काम करतात. त्यावेळचे राजपूत राजा खूप बलवान असायचे. त्यामूळे एका सामर्थ्यवान राजाच्या रूपात दिसण्यासाठी भन्सालींनी शाहिदला मस्क्युलर वजन वाढवायला सांगितले होते.”सध्या पद्मावती सिनेमाचे पोस्टर्स पाहूनच रसिकांना खूप उत्सुकता लागली आहे. संजय लीला भन्साळींनी आज  महारावल रतन सिंह यांच्या रूपातील शाहिदचे दोन पोस्टर्स आज जारी केले. यात शाहिदच्या माथ्यावर लाल टिळा आहे. शाहिदच्या चेह-यावर एक वेगळेच तेज दिसतेय. दुस-या पोस्टरमध्ये त्याच्या हातात तलवार आहे. शिवाय त्याचे कपडे आणि माथे रक्ताने माखलेले आहे असे या सिनेमाच पोस्टर्सनाही रसिकांचा चांगलाच प्रसितसाद मिळत आहे.वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि  संजय लीला भन्साली प्रॉडक्शनचा पद्मावती चित्रपट 1 डिसंबर 2017 ला झळकणार आहे.