Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूरकडून विराट कोहलीची 'नक्कल'; अभिनेत्याच्या नौटंकीवर नेटिझन्सची फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 15:45 IST

शाहिदने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीची नक्कल करताना दिसत आहे. 

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर त्याच्या आगामी 'तेरी बातों मै ऐसा उलझा जिया' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचं शाहिद जोरदार प्रमोशन करत आहे. सध्या शाहिदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहिदने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीची नक्कल करताना दिसत आहे. 

व्हिडिओत शाहिद बॅट घेऊन किंग कोहलीसारखा चालताना दिसत आहे. या व्हिडिओत तो म्हणतो, "दाल मखनी खाऊंगा, पनीर कुलचन खाऊंगा, गार्लिक नान खाऊंगा...उसके बाद गुलाबजामून खाऊंगा आइसक्रीम के साथ...उसके बाद कसाटा आइसक्रीम खाएंगें फिर रात को टीव्ही देखेंगे." विराट कोहलीच्या आवाजातील हा व्हिडिओ शेअर करत शाहिदने "प्रमोशन संपल्यानंतरचं फिलिंग", असं म्हटलं आहे. त्याच्या या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

शाहिदच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. "विराट कोहलीच्या बायोपिकसाठी शाहिद कपूर बेस्ट आहे", असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "मी हा व्हिडिओ लूपमध्ये बघत आहे", अशी कमेंट केली आहे. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये विराट कोहलीचे फोटो आणि gif देखील शेअर केले आहेत. 

शाहिद कपूरचा 'तेरी बातों मै ऐसा उलझा जिया' हा सिनेमा व्हॅलेंटाइन वीकच्या मुहुर्तावर ९ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहिदबरोबर बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत आहे. 

टॅग्स :शाहिद कपूरविराट कोहलीऑफ द फिल्ड