Join us
Daily Top 2Weekly Top 5

​डॅड पंकज कपूर यांना ‘रंगून’मध्ये कुठेच दिसला नाही शाहिद कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 14:38 IST

शाहिद कपूर हा एक गुणी अभिनेता आहे. पण चित्रपट कुठलाही असो, भूमिका कुठलीही असो, शाहिदला प्रतीक्षा असते ती त्याच्या ...

शाहिद कपूर हा एक गुणी अभिनेता आहे. पण चित्रपट कुठलाही असो, भूमिका कुठलीही असो, शाहिदला प्रतीक्षा असते ती त्याच्या डॅडच्या प्रतिक्रियेची. होय, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर यांच्या कॉम्प्लिमेंटची.  एक प्रभल्भ व परिपूर्ण अभिनेता अशी पंकज कपूर यांची ओळख आहे. त्यांची प्रतिक्रिया शाहिदसाठी प्रचंड महत्त्व ठेवते. साहजिक आगामी ‘रंगून’ या चित्रपटाबद्दलही शाहिदला डॅडीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा असणारच. मग काय, डॅड पंकज कपूर यांनी शाहिदचा ‘रंगून’ पाहिला. पण संपूर्ण चित्रपटात त्यांना शाहिद कुठेच दिसला नाही. अर्थात यामागे एक विशेष कारण आहे. ते काय तर पुढे वाचा...‘रंगून’मध्ये शाहिद कपूर नवाब मलिक नावाच्या एका लष्करी जवानाची भूमिका साकारतो आहे. ४० च्या दशकाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात कंगना राणौत, सैफ अली खान हे सुद्धा लीड रोलमध्ये आहेत. ‘कमीने’ आणि ‘हैदर’ नंतर शाहिदचा हा तिसरा चित्रपट आहे. पहिल्या दोन चित्रपटातील शाहिदच्या अभिनयाची सगळ्यांनीच तोंडभरून प्रशंसा केली होती. ‘रंगून’च्या ट्रेलरमधील शाहिदच्या अभिनयाचेही बरेच कौतुक होत आहे. पण शाहिदला डॅडी पंकज कपूर यांच्याकडून प्रतिक्रिया हवी होती.अखेर तो क्षण आला. ‘रंगून’चे दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. साहजिक या स्पेशल स्क्रिनिंगला शाहिदचे पापा पंकज कपूर यांनाही बोलवले गेले होते. स्क्रिनिंगनंतर विशाल यांनी पंकज यांना चित्रपटाबद्दलचे मत विचारले. यावर पंकज कपूर यांची प्रतिक्रिया काय होती ठाऊक आहे. ‘मला चित्रपटात शाहिद कुठेच दिसला नाही. मला दिसला केवळ नवाब मलिक’, असे पंकज कपूर म्हणाले. डॅड पंकज कपूर यांच्या या प्रतिक्रियेने शाहिदचा आनंद गगणात मावेनासा झाला नसेल तर नवल.ALSO READ : सैफ अन् शाहीदच्या मिशांमुळे इतकी का वैतागली कंगना राणौत?Ye Ishq Hai Song Launch : शाहिद कपूर-कंगना राणौत यांची Sizzling Chemistry