Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूरला जोरदार टक्कर देतोयं भाऊ ईशान खट्टर! पाहा व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 13:00 IST

शाहिद कपूरचे नाव बॉलिवूडच्या बेस्ट डान्सरमध्ये घेतले जाते. पण आता कदाचित शाहिदला घरातच स्पर्धक निर्माण झाला आहे. आम्ही कुणाबद्दल बोलतोय, ते तुमच्या लक्षात आलेच असेल.

शाहिद कपूरचे नाव बॉलिवूडच्या बेस्ट डान्सरमध्ये घेतले जाते. पण आता कदाचित शाहिदला घरातच स्पर्धक निर्माण झाला आहे. आम्ही कुणाबद्दल बोलतोय, ते तुमच्या लक्षात आलेच असेल. होय, आम्ही बोलतोयं ते शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरबद्दल. याचे कारण आहे, ईशानने शेअर केलेला व्हिडिओ. ईशानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ईशान शानदार डान्स मुव्ज करताना दिसतोय. त्याचा डान्स शाहिदला टक्कर देणारा आहे. अर्थात दोघांच्याही डान्स मुव्जमध्ये बरेच साम्य आहे.ईशान लवकरच ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतो आहे. इराणचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक माजिद मजीदी हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. ‘साँग आॅफ स्पॅरोज’,‘बारन’,‘दी कलर आॅफ पॅराडाईज’ आणि ‘चिल्ड्रेन आॅफ हेविन’ अशा जगप्रसिद्ध चित्रपटांसाठी मजीदी ओळखले जातात. मजीदी ईशानचा अभिनय पाहून बरेच प्रभावित झाल्याचे कळतेय. हिंदी आणि इंग्रजी भाषेत हा चित्रपट तयार केला जाणार असून नंतर तो फारसी भाषेत डब केला जाणार आहे.ALSO READ: ईशान खट्टरसोबत पुन्हा स्पॉट झाली जान्हवी कपूर, कॅमेरे दिसताच वेगवेगळ्या वाटेवरून गाठले घर !‘बियॉन्ड द क्लाऊड्स’नंतर ईशान मराठी चित्रपट ‘सैराट’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार असल्याची खबर आहे. यात तो श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिच्यासोबत दिसणार आहे. अलीकडे ईशान व जान्हवी हे दोघेही सर्रास एकत्र दिसतात. कालपरवा वांद्रयातील एका रेस्टॉरंटबाहेर ईशान व जान्हवी दोघेही स्पॉट झाले होते. त्यामुळेच मध्यंतरी दोघांच्याही अफेअरच्या चर्चाही झाली होती. येत्या १ डिसेंबरपासून ‘सैराट’च्या हिंदी रिमेकचे शूटींग सुरु होणे अपेक्षित आहे. करण जोहरने ‘सैराट’च्या हिंदी रिमेकचे राईट्स खरेदी केले आहे. अर्थात या हिंदी रिमेकच्या स्क्रिप्ट व स्क्रिनप्लेमध्ये त्याने काही बदल केले आहेत. शशांक खेतान हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. २०१६ मध्ये मराठीत आलेल्या ‘सैराट’मध्ये आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या, तर हिंदी रिमेकमध्ये जान्हवी आणि ईशान लीड रोलमध्ये बघावयास मिळणार आहेत.   हा चित्रपट पुढील वर्षी जून किंवा जुलै महिन्यात रिलीज होणार आहे.