Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूरने पत्नी मीरासमोर केला एक्स गर्लफ्रेंडबद्दल खुलासा; म्हटले, ‘तिने मला चीट केले’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 18:09 IST

शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत नुकतीच नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये पोहोचले होते. याठिकाणी त्याने चक्क त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल खुलासा केला.

अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत नेहा धुपियाच्या ‘BFFs with Vogue’ या शोमध्ये पोहोचले होते. या शोमध्ये शाहिद आणि मीराने नेहासोबत अनेक गोष्टींचा उलगडा केला. यावेळी नेहाने शाहिद आणि मीराला काही पर्सनल प्रश्नही विचारले, ज्याचे शाहिद हसत-हसत उत्तरे दिलीत. यावेळी शाहिदने हेदेखील सांगितले की, एक्स गर्लफ्रेंडने त्याच्याशी चीट केले. शोची होस्ट असलेल्या नेहा धुपियाने शाहिदला प्रश्न विचारला की, तुला कोणी चीट केले आहे काय? जर केले असेल तर कोणी? हा प्रश्न ऐकताच शाहिदला हसू आवरणे अवघड झाले होते. मात्र यामुळे मीराची चांगलीच चलबिचल झाल्याचे दिसून आले. तिने नेहाचा हा प्रश्न पुढे मांडताना त्याला कितीतरी मुलींनी चीट केले असेल? असे म्हटले. मीराच्या या वक्तव्यानंतर मात्र शाहिदला या प्रश्नाचे उत्तरे देणे क्रमप्राप्त ठरले. त्याने मीराकडे बघून बºयाच नाही फक्त एका मुलीबद्दलच मी खात्रीशीलपणे सांगू शकेल, असे म्हटले. वास्तविक शाहिद आणि मीराने ‘BFFs with Vogue’ या शोमध्ये एकत्र शॉट दिले. यादरम्यान या दाम्पत्याने आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी नेहाने मीराला विचारले की, पार्टीमध्ये कोणता सेलेब्स बोअरिंग होतो? यावर मीराने लगेचच शाहिदचे नाव घेतले. शाहिंदने मीराचे उत्तर ऐकताच तिच्याकडे तिरप्या नजरेने बघितले. शाहिदला हे उत्तर आवडले नसावे असे मीराच्या लक्षात आल्यानंतर तिने लगेचच सारवासारव करताना चेष्टा करीत असल्याचे म्हटले.  त्यानंतर नेहाने शाहिदला विचारले की, तुला किती मुलींनी चीट केले? यावर शाहिदने स्पष्ट शब्दात सांगितले की, मी एकीबद्दल सांगू शकतो. कारण माझ्या मते, मला एकाच मुलीने चीट केले आहे. दुसरीबद्दल मला डाउट आहे. नेहाने याच प्रश्नाच्या अनुषंगाने आणखी एक प्रश्न विचारताना म्हटले की, ती हायप्रोफाइल अभिनेत्री आहे काय? जिच्यासोबत तू रिलेशनशिपमध्ये अगोदर राहिलेला आहेस? नेहाच्या या प्रश्नानंतर मात्र शाहिदची चांगलीच भांबेरी उडाली. त्याने कोणाचेही नाव न घेता या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.