Join us
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार शाहिद कपूर? OMG 2 च्या दिग्दर्शकांचा नवा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 12:25 IST

शाहिद कपूर आगामी सिनेमात छत्रपती शिवरायांची भूमिका साकारण्याची शक्यता आहे. क्लिक करुन वाचा सविस्तर

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता शाहिद कपूर हा सर्वांचा लाडका अभिनेता. शाहिदने आजवर विविध सिनेमांमधून त्याच्या अभिनयातून लोकांचं मन जिंकलंय. शाहिदने यावर्षी रिलीज झालेल्या 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' सिनेमातून प्रेक्षकांचं मन जिंकलं. अशातच शाहिदच्या फॅन्ससाठी एक खास बातमी जी ऐकून सर्वांना आनंद होईल. शाहिद कपूर लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असल्याची बातमी समोर येतेय. 

काहीच दिवसांपुर्वी प्राईम व्हिडीओने आगामी प्रोजेक्ट्सची घोषणा केली. त्यावेळी आदित्य धर यांच्या शाहिदची प्रमुख भूमिका असलेल्या 'अश्वत्थामा' या बिग बजेट सिनेमाची घोषणा झाली. आता शाहिद कपूर आगामी प्रोजेक्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. 'ओह माय गॉड 2' चे दिग्दर्शक अमित राय छत्रपती शिवरायांवर आधारित सिनेमाच्या तयारीत असून महाराजांच्या भूमिकेसाठी शाहिदशी बोलणी सुरु असल्याची चर्चा आहे.

याआधी शाहिदने संजय लीला भन्सालींच्या 'पद्मावत'मध्ये रावल रतन सिंह ही भूमिका साकारली. या भूमिकेनंतर शाहिद पुन्हा एकदा ऐतिहासीक भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे आगामी सिनेमात शाहिदला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत पाहायला सगळेजण उत्सुक असतील यात शंका नाही. शाहिद सध्या आगामी 'देवा' सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

टॅग्स :शाहिद कपूरछत्रपती शिवाजी महाराजसंजय लीला भन्साळी