Join us
Daily Top 2Weekly Top 5

हुमा कुरेशीसोबत अफेअर चर्चेवरून संतापला शाहिद कपूर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 16:19 IST

शाहिद कपूर आणि हुमा कुरेशी बॉलिवूडमधील फेमस कलाकारांपैकी एक आहेत. अनुराग कश्यपच्या गँग ऑफ वासेपूर चित्रपटातून हुमाने बॉलिवूडमध्ये डेब्यू ...

शाहिद कपूर आणि हुमा कुरेशी बॉलिवूडमधील फेमस कलाकारांपैकी एक आहेत. अनुराग कश्यपच्या गँग ऑफ वासेपूर चित्रपटातून हुमाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. तिच्या अभिनयाने तिने सर्वांनाच मोहित केले. त्याचबरोबर गँग्स ऑफ वासेपुर २ मध्ये केलेल्या अभिनयाने ती चर्चेत राहिली.हुमा अजून एका बातमीमुळे चर्चेत आली आहे ते म्हणजे तिचे नाव बॉलिवूडचा अभिनेता शाहिद कपूरबरोबर जोडण्यात आले होते. चला तुम्हाला सांगतो यावर शाहिदने काय प्रतिक्रिया दिली होती. शाहिद कपूरबरोबर हुमा कुरेशीचे तेव्हा जोडण्यात आले जेव्हा ते दोघे अचानक मुंबई आणि गोवा मध्ये एकत्र दिसले, त्यांच्या एकत्र दिसण्यावरून बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. ऐवढेच नाही हुमाला शाहिद कपूरवरून प्रश्नदेखील विचारण्यात येऊ लागले पण तिने शाहिद आणि आपल्या नात्याबद्दल काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर असाच एक प्रश्न शाहिद कपूरला विचारला असता त्याने हुमाशी असलेल्या नात्याबद्दल एक इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तो चांगलाच संतापला होता शाहिद म्हणाला, माझे आणि हुमाचे अफेअर नाही आणि मला या प्रश्नाचे उत्तर देणे फार गंमतीदार वाटते कारण ह्या मुलीला मी माझ्या पूर्ण आयुष्यात फक्त दोनदा भेटलो आहे.शाहिदच्या आधी हुमाचे नाव सोहेल खानसोबत सुद्धा जोडण्यात आले होते. अरबाज आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट हुमामुळे झाल्याची चर्चादेखील रंगली होती. अनेक सार्वजनिक ठिकाणी हुमा आणि सोहेल एकत्र फिरताना दिसायचे. मात्र या दोघांनीही या केवळ अफवा असल्याचे सांगितले.    लवकरच शाहिद कपूरचा पद्मावती चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तो राणी पद्मावतीचा पती म्हणजे राजा रावल रतन सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. तर यात राणी पद्मावतीची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार आहे आणि  रणवीर सिंग अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत झळकणार आहे. 1 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानंतर शाहिद कपूर दिग्दर्शक श्री नारायण सिंगच्या चित्रपटात दिसणार आहे. यात तो वकिलाची भूमिका साकारणार आहे. यात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ झळकणार आहे. ALSO READ :  ​​‘जब वी मेट’ची दशकपूर्ती ! असे झाले होते शूटींग!!