O Romeo Cinema: अभिनेता शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरीची प्रमुख भूमिका असलेला 'ओ रोमियो' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची इंडस्ट्रीत चर्चा आहे. अखेर १३ फेब्रुवारीला ओ रोमिओ रिलीज करण्यात आला. हैदर आणि कमिनेनंतर विशाल भारद्वाज ही नवीन कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन आलेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता प्रदर्शनाच्या ५ दिवसांनंतर या रोमॅन्टिक अॅक्शन चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
ओ रोमियो हा सिनेमा हुसैन झैही यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारित आहे. कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ४५-६० दिवसानंतर ओटीटीवर रिलीज केला जातो. दरम्यान,ओ रोमिओ चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज केल्यानंतर हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर स्ट्रीम होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. आता लवकर हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.
कधी अन् कुठे बघाल?
विशाल भारद्वाज दिग्दर्शित ओ रोमिओ सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटीवर कधी स्ट्रीम होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. या संदर्भात आता मोठी माहिती हाती आली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, एप्रिल २०२६ पर्यंत हा सिनेमा 'Amazon Prime' वर रिलीज करण्यात येणार आहे.
'ओ रोमिओ'चं दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केलं आहे. या सिनेमात शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, नाना पाटेकर, दिशा पटानी, अविनाश तिवारी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'ओ रोमियो' हा चित्रपट १९९५ च्या काळातील मुंबईतील गँगस्टर संस्कृतीवर आधारित असून त्यात भरपूर ॲक्शन बघायला मिळणार आहे. या सिनेमाचं १५० कोटींचं बजेट असल्याची चर्चा आहे.
Web Summary : Shahid Kapoor's 'O Romeo,' set against Mumbai's gangster backdrop, is now in theaters. The film, based on Hussain Zaidi's book, will stream on Amazon Prime in April 2026. Expect action and drama!
Web Summary : शाहिद कपूर की 'ओ रोमियो', मुंबई के गैंगस्टर पृष्ठभूमि पर आधारित, अब सिनेमाघरों में है। हुसैन जैदी की किताब पर आधारित यह फिल्म अप्रैल 2026 में अमेज़न प्राइम पर स्ट्रीम होगी। एक्शन और ड्रामा की उम्मीद करें!