शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या तान्हुला झेन रूग्णालयातून घरी आला. रूग्णालयातून घराकडे रवाना होत असताना झेनची पहिली झलक दिसली. यावेळी पापा शाहिद कपूर आणि मोठी बहीण मीशा त्याच्यासोबत होते.झेनच्या जन्माचा आनंद मीरा आणि शाहिद या दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. ऐरवी मीडियाला पाहून काहीशी रागात येणारी मीरा झेनला कुशीत घेऊन अगदी आरामात मीडियाला पोज देताना दिसली.
शाहिद-मीराच्या मुलाच्या नावासाठी सोशल मीडियावर चाहत्यांनी या कपलला मजेशीर सल्ले दिले होते. यामध्ये राहिद कपूर आणि शमी कपूर हे दोन पर्याय चाहत्यांनी सुचवले होते. शाहिद व मीरा यांना आधीच मीशा नावाची दोन वर्षांची मुलगी आहे. शाहिद-मीराच्या लग्नाच्या एक वषार्नंतरच मुलगी मीशा (26 आॅगस्ट 2016)चा जन्म झाला. ती गत 26 आॅगस्टला 2 वर्षांची झाली.