Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूर आणि क्रिती सनाॅनचा रोमांस पाहण्यासाठी करावी लागणार प्रतिक्षा, सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 17:45 IST

यात शाहिद कपूर एका वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे.

काही महिन्यांपू्र्वी शाहिद कपूर आणि क्रिती सेनन एका चित्रपटात एकत्र येणार असल्याची घोषणा झाली, तेव्हा चाहत्यांची चांगलीच उत्सुकता वाढली. सिनेमाचे टायटल अजून सांगितलं गेलेल नाही. शाहिद आणि क्रितीचा हा सिनेमा डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता. मात्र आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. अजून नवीन रिलीज डेट सांगण्यात आलेली नाही. 

शाहिद-क्रिती स्टारर हा चित्रपट पुढील वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०२४ रोजी रिलीज होणार आहे.शाहिद-क्रिती स्टारर हा सिनेमा प्रेमकथेवर आधारित आहे. याआधी हा सिनेमा ७ डिसेंबर २०२३ ला रिलीज होणार होता.

रिपोर्टनुसार, यात दमदार डान्स नंबर आणि रोमँटिक गाणी देखील असतील. या शाहिद कपूर एका वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे जो रोबोटच्या प्रेमात पडतो. क्रिती रोबोटच्या भूमिकेत दिसणार आहे.

आगामी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि लक्ष्मण उतेकर करत आहेत. शाहिद आणि क्रितीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता शेवटचा 'फर्जी' आणि 'ब्लडी डॅडी' मध्ये दिसला होता. येत्या काही दिवसांत शाहिद सिद्धार्थ रॉय कपूरच्या अॅक्शन एंटरटेनरमध्ये दिसणार आहे. तर क्रिती सेनन 'गणपत' आणि 'दो पत्ती' या चित्रपटात दिसणार आहे.

टॅग्स :शाहिद कपूरक्रिती सनॉन