‘पद्मावती’च्या शूटिंगला शाहिदने केली सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 22:28 IST
Shahid Kapoor start shooting of Padmavati ; संजय लीला भंसाळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटात शाहिद कपूर राजा रतन सिंग याची भूमिका साकारतो आहे. शूटिंगच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता त्याने सोशल मीडियाहून व्यक्त केली आहे.
‘पद्मावती’च्या शूटिंगला शाहिदने केली सुरुवात
बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ अभिनेता शाहिद कपूर मागील काही दिवसांपासून दाढी मिशीत दिसतोय, मात्र आता त्याचा लूक हळूहळू बदलत चालला आहे. त्याने आपल्या मिशांना पिळदार वळण देणे सुरू केले असून ‘पद्मावती’च्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी त्याने आपला नवा अंदाजातील फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर शाहिद चांगलाच अॅक्टिव्ह आहे. आपले वेगवेगळे फोटो तो अपलोड करीतच असतो. मागील काही दिवसांपासून शाहिदच्या चाहत्यांना त्याचा लूक एकसारखाच दिसत होता. मात्र, त्याने अपलोड केलेल्या एका नव्या फोटोमध्ये त्याचा लूक बदललेला दिसतो आहे. त्याने आपल्या मिशा पिळदार केल्या आहेत. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटात त्याचा लूक कसा असले याचा अंदाज या फोटोवरून लावता येतो. ">http:// संजय लीला भंसाळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटात शाहिद कपूर दीपिकाचा पती राजा रतन सिंग यांची भूमिका साकारत असून त्याचा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. राजा रतन सिंग हा राजपूत राजा असल्याने त्याने आपल्या मिशांना पिळदार वळण दिले आहे. ‘पद्मावती’ची शूटिंग सुरू झाली असून शाहिदने आपल्या शूटिंगच्या पूर्वी एक फोटो अपलोड केला आहे त्याने या फोटवर ‘पद्मावती’च्या शूटिंगचा पहिला दिवस, मला शुभेच्छा द्या असे कॅप्शन दिले आहे. ‘पद्मावती’च्या शूटिंगपूर्वी शाहिद आपल्या पत्नी मीरा व मुलगी मिशा यांच्यासोबत छोटेखानी व्हॅकेशनवरून परतला आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करीत असलेल्या ‘पद्मावती’मध्ये रणवीर सिंग, दीपिका पादुकोन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शाहिद कपूर पहिल्यांदाच भंसाळी यांच्यासोबत काम करतो आहे. ">http://