Join us

शाहिद हॅकर्सच्या निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:48 IST

सोशल मीडियावर हॅकर्स आता चित्रपटांतील सेलिब्रिटींना आपला निशाणा बनवत आहेत. गेल्या काही दिवसांत अमिताभ बच्चनचे ट्विटर अकाऊंट हॅक केले ...

सोशल मीडियावर हॅकर्स आता चित्रपटांतील सेलिब्रिटींना आपला निशाणा बनवत आहेत. गेल्या काही दिवसांत अमिताभ बच्चनचे ट्विटर अकाऊंट हॅक केले होते. आता हॅकर्सचा पुढचा शिकार शाहीद कपूर बनला आहे. काही तासांपूर्वी शाहीदचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले होते. त्याने स्वत: ही माहिती ट्विटरवर दिली आहे. शाहीदने ट्विट केले की,'माझे फेसबुक अकाऊंट हॅक झाले असून थोड्या दिवसांत ते ठीक होईल. जर तुम्ही एखादे दुसरे अकाऊंट पाहता तर समजा की तो मी नाही. ताबडतोब थोड्याच वेळात त्याने सांगितले की, 'आता त्याचे अकाऊंट सुरक्षित झाले आहे. गणपती बाप्पा मोरया!'