Join us

शाहिदने रणवीरला करून दिली आठवण : डेब्यू अ‍ॅवॉर्ड स्वीकारत असताना मीच होस्ट होतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 19:57 IST

‘पद्मावती’मधील रणवीर सिंग व शाहिद कपूर यांच्या भूमिकांवरून वाद सुरू असल्याची चर्चा आहे. शाहिद कपूरने आमच्यात कोणताच वाद नसल्याचे ...

‘पद्मावती’मधील रणवीर सिंग व शाहिद कपूर यांच्या भूमिकांवरून वाद सुरू असल्याची चर्चा आहे. शाहिद कपूरने आमच्यात कोणताच वाद नसल्याचे सांगून यावर पडदा पाडला आहे. याचसोबतच त्याने रणवीर डेब्यू अवॉर्ड स्वीकारत असताना मी तो अवॉर्ड शो होस्ट करीत असल्याची आठवण करून दिली. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्यासह दीपिका पादुकोण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात दीपिका पद्मावतीची, शाहिद कपूर पद्मावतीचा पती राजा रतन सिंगच्या व रणवीर सिंग हा अलाऊद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसणार आहे. सुरुवातीला अलाऊद्दीन खिलजीची भूमिक ा शाहिदला आॅफर करण्यात आली होती असे सांगण्यात येते. दुसरीकडे रणवीरने राजा रतन सिंगच्या भूमिकेला नकार दिला होता. त्याने अलाऊद्दीन खिलजीच्या भूमिकेसाठी हट्ट धरला होता. यातूनच दोघांत वाद सुरू झाला असल्याचे सांगण्यात येते. याच वादावर शाहिदने आपली बाजू मांडली आहे. शाहिद म्हणाला, रणवीर जेव्हा आपला डेब्यू अ‍ॅवॉर्ड स्वीकारत होता त्यावेळी मी तो शो होस्ट करीत होतो. मला आठवते त्यावेळी तो रडत होता. त्याच्यासाठी ती वेळ स्पेशल होती. मागील ६ वर्षांत मी त्याला प्रगती करताना पाहिले आहे. त्याने बाजीराव मस्तानीमध्ये चांगला अभिनय केला आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरने शाहिद सोबतच्या वादावर आपले मत व्यक्त करताना, दोघांत वाद नसल्याचे कबूल केले होते. मी शाहिदसोबत काम करण्यास उत्सुक आहे. शाहिद उत्कृष्ट अभिनेता आहे. तो चित्रपटात आपला जीव ओतून काम करतो, असे तो म्हणाला होता.आता दोघांनी आपल्या बाजू मांडल्या असून, वाद नसल्याचे सांगितले खरे. शाहिदने रणवीरच्या डेब्यूचा उल्लेख करून मी त्याचा सिनिअर आहे हे सांगण्याचाच प्रयत्न केला आहे.