Join us

शाहीद-फराहचा अलास्का क्लिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 23:00 IST

शाहीद कपूर सध्या ‘रंगून’ या आगामी चित्रपटासाठी खुप चर्चेत आहे. कंगणा राणावत आणि सैफ अली खान हे देखील महत्त्वाच्या ...

शाहीद कपूर सध्या ‘रंगून’ या आगामी चित्रपटासाठी खुप चर्चेत आहे. कंगणा राणावत आणि सैफ अली खान हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शाहीद नुकताच कोरिओग्राफर फराह खानसोबत एअरपोर्टवर उतरला आणि त्याने फावल्या वेळेचा सेल्फी काढून चांगलाच उपयोग करून घेतला.अलास्का सारख्या बर्फाळ प्रदेशात त्यांनी सोबत वेळ घालवला आणि अशा सुंदर वातावरणात त्यांनी त्यांच्या फ्लाईटची खुप संयमाने वाट पाहिली. फराहने फोटो टिवटरवर शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की, ‘ नो वी आर नॉट इन अलास्का. स्ट्रँडेड अ‍ॅट लिलाबरी एअरपोर्ट विथ शाहीदकपूर...रंगून..यह फ्लाईट कब आयेगी?’ फराहने शाहीद-कंगणा यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले एक रोमँटिक साँग कोरिओग्राफ केले आहे. }}}}