Join us
Daily Top 2Weekly Top 5

​शाहीदने केला करिनाचा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 21:02 IST

करिना कपूर आणि शाहिद कपूर यांची एकेकाळी गाजलेली ‘लव्हस्टोरी’ आता जुनी झाला. सध्या शाहिद बाप बनल्याचा आनंद उपभोगतोय तर ...

करिना कपूर आणि शाहिद कपूर यांची एकेकाळी गाजलेली ‘लव्हस्टोरी’ आता जुनी झाला. सध्या शाहिद बाप बनल्याचा आनंद उपभोगतोय तर दुसरीकडे करिना आई होणार असल्याने प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. लवकरच करिना कपूर खान एका बेबी केअर आॅईलची जाहिरात करताना दिसणार आहे. प्रेग्नंसीनंतरही काम करणार, हे करिनाने आधीच सांगितले आहे. पण प्रेग्नंसीतही करिनाचे काम सुरु आहे. संबंधित बेबी केअर आॅईलची शूटींग करण्यासाठी करिना सज्ज आहे. पण बातमी केवळ हीच नाही. तर ही जाहिरात करिनाला शाहीदमुळे मिळाली आहे, ही खरी बातमी आहे. बेबी केअर आॅईलच्या या जाहिरातीचा प्रस्ताव आधी शाहीदला दिला गेला होता. पण नुकताच बाप बनलेल्या शाहीदने या जाहिरातीसाठी नकार दिला. मग काय, या जाहिरातीचा प्रस्ताव थेट आई होणार असलेल्या करिनाजवळ पोहोचला. करिनाने लगेच अगदी आनंदाने ही संधी कॅश केली, हे सांगणे नकोच.