Join us

शाहरूख खानच्या ‘झिरो’मध्ये दिसणार हा सुंदर चेहरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 10:31 IST

शाहरुख खानच्या या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आर शाहरूख खानचा ‘झिरो’ हा चित्रपटाने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

शाहरुख खानच्या या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आर शाहरूख खानचा ‘झिरो’ हा चित्रपटाने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्वत: शाहरूखसाठीही हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. यासाठी तो तेवढे कष्टही घेतोय. या चित्रपटात शाहरूखसोबत अनेक बड्या स्टार्सचा भरणा आहे. आता एक आणखी सुंदर चेहरा यात सामील झाला आहे. हा चेहरा कुणाचा तर सुश्री श्रेया मिश्रा हिचा. होय, तीन वर्षांपूर्वी एका सौदर्य स्पर्धेत तिस-या स्थानी राहिलेली सुश्री शाहरूखच्या या चित्रपटात एका छोट्या पण महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. यात ती अभय देओलच्या गर्लफ्रेन्डची भूमिका वठवताना दिसणार आहे. अभय देओलला आपण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहू शकणार आहोत. प्राप्त माहितीनुसार, सुश्री आपल्या या भूमिकेबद्दल कमालीची उत्सूक आहे. मुकेश छाबडा यांच्या कास्टिंग कंपनीमुळे माझ्या झोळीत ही भूमिका पडली आणि माझे स्वप्न पूर्ण झाले, असे सुश्री प्रत्येकाला सांगत असते आणि सांगणार का नाही, शाहरूखसारख्या सुपरस्टारच्या चित्रपटात तिला संधी मिळाली आहे. ओडिशाची सुश्री सन २०१५ मध्ये युनायटेढ कॉन्टिनेंट स्पर्धेत तिसरी आली होती. स्कूबा डायव्हर आणि एरिअल सिल्क रोप डान्सर अशीही तिची एक ओळख आहे. मॉडेलिंगच्या दुनियेत सुश्रीचे मोठे नाव आहे. आता बॉलिवूडमध्ये सुश्री हे नाव किती मोठे होते, ते बघूच.आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटात शाहरूख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे. यात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा एका यशस्वी महिला शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहे. तर कॅटरिना कैफ एका व्यसनी हिरोईनची भूमिका साकारताना दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट या सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. एका गाण्यात सलमान आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीही झळकणार आहेत.  श्रीदेवींनी आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या वाट्याचे सीन शूट केले होते. त्याअर्थाने ‘झिरो’ हा श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ठरणार आहे. येत्या  २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.