Join us

शाहरूखचा लेक आर्यन खान NCBच्या जाळ्यात अन् नेटकरी झाले ‘सैराट’, मीम्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 13:58 IST

Mumbai Cruise Drug Case: आर्यन खान सोशल मीडियावर फार अ‍ॅक्टिव्ह नाही. पण एनसीबीने ताब्यात घेताच तो ट्विटरवर ट्रेंड करू लागला. पाठोपाठ आर्यन खानवरचे अनेक मीम्स व्हायरल होऊ लागलेत.

ठळक मुद्देएनसीबी अधिका-यांनी आर्यन खानचे क्रूझवरील व्हिडीओ मिळवले आहेत.

शाहरूख खानचा (ShahRukh Khan) लाडका लेक आर्यन खानला (Aryan Khan)अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) ताब्यात घेतलं आणि बातमी वा-यासारखी पसरली. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने (NCB) आठ जणांना ताब्यात घेतलं, आर्यन त्यातलाच एक़ यावेळी एनसीबीने मोठ्या प्रमाणात ड्रग्जदेखील जप्त केलं.   तूर्तास आर्यन खानची अधिका-यांकडून चौकशी केली जात आहे. त्याला अटक होण्याचीही शक्यता आहे. आता अशात सोशल मीडियावर याची चर्चा रंगणार नाही तर नवल. तसा आर्यन खान सोशल मीडियावर फार अ‍ॅक्टिव्ह नाही. पण एनसीबीने ताब्यात घेताच तो ट्विटरवर ट्रेंड करू लागला. पाठोपाठ आर्यन खानवरचे अनेक मीम्स व्हायरल होऊ लागलेत.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खानला क्रूझवरील पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं. पार्टीत जाण्यासाठी त्याला कोणतेही पैसे भरावे लागले नव्हते. चौकशीदरम्यान आर्यन खानने कार्यक्रमाच्या आयोजकांना आपल्या नावाचा वापर करत इतरांना आमंत्रण दिलं असा दावा केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार कॉर्डेलिया या 2 हजार प्रवासी क्षमतेच्या आलीशान क्रूझवर ड्रग्ज पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात उच्चभ्रूंचा प्रामुख्याने समावेश होता. याप्रकरणी आर्यन खान याचीही चौकशी केली जात आहे. 

एनसीबी अधिका-यांनी आर्यन खानचे क्रूझवरील व्हिडीओ मिळवले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओंमध्ये आर्यन खान सफेद टी-शर्ट, लाल शर्ट, निळी जीन्स आणि टोपीत दिसत आहे. दरम्यान, आर्यन खान यानं एनसीबीच्या अधिका-यांनी केलेल्या चौकशीत आपल्याला पार्टीत व्हीआयपी गेस्ट म्हणून बोलावलं होतं. त्याच्याकडून क्रूझवर येण्यासाठी कोणतीही फी घेण्यात आली नव्हती. याशिवाय माझ्या नावाचा वापर करुन इतरांना बोलावलं होतं, अशी माहिती दिली आहे. 

टॅग्स :आर्यन खानशाहरुख खाननार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो