Join us
Daily Top 2Weekly Top 5

मैं भी कर रहा हूं शादी...हे काय बोलून गेला शाहरूख खान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 17:17 IST

होय, काल रात्री वोग ब्युटी अवार्ड सोहळ्याला किंगखान शाहरूखने हजेरी लावली. शाहरूखला दीर्घकाळानंतर आपल्यात पाहून मीडिया कमालीचा सुखावला. शाहरूखनेही मीडियासोबत हसतखेळत मनमोकळ्या गप्पा मारल्या. 

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सीझन आहे. लवकरच प्रियांका चोप्रा आणि तिचा अमेरिकन बॉयफ्रेन्ड निक जोनास लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. साहजिकच इंडस्ट्रीतील अनेक लोक प्रियांकाच्या लग्नालाबद्दल उत्सूक आहेत. प्रियांकाची बेस्ट फ्रेन्ड कंगना राणौत हिने तर आपली ही उत्सुकता बोलूनही दाखवली. प्रियांकासाठी मी खूप आनंदी आहे, असे तिने म्हटले. कंगनापाठोपाठ आता शाहरूख खानचीही प्रतिक्रिया आली आहे. होय, काल रात्री वोग ब्युटी अवार्ड सोहळ्याला किंगखान शाहरूखने हजेरी लावली. शाहरूखला दीर्घकाळानंतर आपल्यात पाहून मीडिया  कमालीचा सुखावला. शाहरूखनेही मीडियासोबत हसतखेळत मनमोकळ्या गप्पा मारल्या. याचदरम्यान एका पत्रकाराने शाहरूखला प्रियांका व निकच्या लग्नाच्या चर्चेबद्दल छेडले. पण शाहरूख मस्तीच्या मूडमध्ये होता. त्याने या प्रश्नावर चांगलेच मजेशीर उत्तर दिले.

 (साभार)

‘मैं भी कर रहा हूं शादी. आपको भी न्यौता जरूर भेजूंगा. मेरा कार्ड आएगा आपके पास और हां मेहंदी में जरूर आना,’ असे शाहरूख म्हणाला. त्याच्या या उत्तराने सगळीकडे एकच खसखस पिकली. तुम्हाला शाहरूखची ही प्रतिक्रिया कशी वाटली, ते सांगायला विसरू नका.प्रियांका व शाहरूखची जोडी २०११ मध्ये ‘डॉन2’ या चित्रपटात अखेरची दिसली होती. यानंतर ही जोडी पडद्यावर कधीच एकत्र दिसली नाही. 

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने सलमान खानच्या ‘भारत’मधून ऐनवेळी अंग काढून घेतले आणि प्रियांका लवकरच लग्न करणार, या चर्चेला जोर चढला. यातचं प्रियांका व तिचा अमेरिकन बॉयफ्रेन्ड निक जोनास यांनी साखरपुडा केल्याचे वृत्त आले. गत १८ जुलैला प्रियांकाच्या वाढदिवसाच्या दिवशी निकने तिला प्रपोज केल्याचे या वृत्तात म्हटले गेले. आता  प्रियांका व निक येत्या सप्टेंबर महिन्यात लग्न करू शकतात, असे कळतेय. येत्या १६ सप्टेंबरला निक २६ वर्षांचा होतोय. याच दिवशी या कपलचा डबल सेलिब्रेशनचा प्लान असल्याचे कळतेय. 

टॅग्स :शाहरुख खान