Join us

​शाहरुख खानच्या पार्टीत कपिल शर्मा होता बिन बुलाया मेहमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2017 10:04 IST

कपिल शर्मा आज छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरचा स्टार बनला आहे. त्याच्या द कपिल शर्मा शोमध्ये बॉलिवूडचे सगळे सेलिब्रेटी हजेरी ...

कपिल शर्मा आज छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरचा स्टार बनला आहे. त्याच्या द कपिल शर्मा शोमध्ये बॉलिवूडचे सगळे सेलिब्रेटी हजेरी लावण्यासाठी उत्सुक असतात. शाहरुख खानने अनेकवेळा या कार्यक्रमात उपस्थिती लावली आहे आणि त्याचसोबत अनेक पुरस्कार सोहळ्यात कपिल शाहरुखची टर उडवताना आपल्याला पाहायला मिळतो. कपिल आज बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचा चांगला मित्र बनला आहे. त्याच्या आणि शाहरुख खानमध्येदेखील खूप चांगली मैत्री आहे. पण शाहरुखच्या एका पार्टीत कपिलला न बोलवता तो गेला होता असे कोणी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला विश्वास बसेल का? हो, पण हे खरे आहे. शाहरुख खानच्या घरातील एका पार्टीला कपिल त्याच्या चुलत भावासोबत आमंत्रण नसतानाही गेला होता अशी कबुली स्वतः कपिल शर्माने कॉफी विथ करण या कार्यक्रमात दिली आहे. हे ऐकून करण जोहरलादेखील त्याचे हसू आवरता आले नाही. कपिल सांगतो, "माझा एक चुलतभाऊ काही दिवसांसाठी माझ्या घरी आला होता. त्याने शाहरुख खानच्या घराची खूप स्तुती ऐकली होती आणि त्यामुळे त्याला शाहरुख खानचे घर पाहायचे होते. त्यामुळे आम्ही दोघे शहरुखच्या घराच्या इथे गेलो. पण त्या दिवशी कधी नव्हे तो मन्नतचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे आम्ही दोघे थेट घरातच घुसलो. त्याच्या घरातील सिक्युरीटी गार्डने मला लगेचच ओळखले आणि मी या पार्टीसाठी आलो आहे हे समजून त्याने आम्हाला घरात जाण्यास सांगितले. आम्ही घरात गेल्यावर गौरी खान यांनी आमचे स्वागत केले. त्यानंतर शाहरुखनेदेखील आमच्याशी खूप चांगल्या गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात मी मी त्याला स्वतः सांगितले की, मला या पार्टीला तुझ्याकडून निमंत्रणच आलेले नव्हते. पण तरीदेखील मी या पार्टीला आलेलो आहे."