Join us
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीसोबत चिल करताना दिसली शाहरुखची लाडकी लेक सुहाना खान; पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 21:08 IST

शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या बी-टाउनमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. कारण १८ वर्षीय सुहाना एखाद्या बॉलिवूड दीवापेक्षा कमी ...

शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या बी-टाउनमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. कारण १८ वर्षीय सुहाना एखाद्या बॉलिवूड दीवापेक्षा कमी नाही. सुहाना सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव आहे. ती नेहमीच तिचे फोटो तिच्या सोशल अकाउंटवर शेअर करीत असते. नुकताच तिने एक नवा फोटो शेअर केला असून, त्यामध्ये ती तिच्या मैत्रिणींबरोबर चिल करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सुहानाने तिच्या फोटोंची एक सीरिज सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामध्ये सुहानाचे एक्सप्रेशन खूपच क्यूट होते. सुहानाचे हे फोटो युजर्सनी चांगलेच पसंत केले. त्याचबरोबर तिच्या या फोटोंवरून ती बॉलिवूडच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचेही दिसून आले. मात्र तिच्या बॉलिवूड डेब्यूवरून अद्यापपर्यंत काहीही निश्चित नसल्याने ती केव्हा बॉलिवूडमध्ये एंट्री करणार याबाबतची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे. पापा शाहरुखबद्दल सांगायचे झाल्यास, त्याच्या मते, सुहानाने अगोदर तिचे शिक्षण पूर्ण करावे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात सुहाना ख्रिसमस आणि न्यू इअर व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी मुंबई येथे आली होती. यावेळी तिचा भाऊ आर्यनही उपस्थित होता. आता सध्या हे दोघे आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी विदेशात परतले आहेत. सुहाना लंडनला, तर आर्यन कॅलिफोर्निया येथे शिक्षण घेत आहे. वास्तविक सुहाना लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. परंतु अशातही तिचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतो. ती आपली बेस्ट फ्रेंड्स चंकी पांडेची मुलगी अनाया पांडे आणि संजय कपूरचा मुलगा सनाया याच्यासोबत नेहमीच पार्टी एन्जॉय करताना दिसते.