Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘फॅन’च्या ट्रेलरमध्ये शिरला ‘फॅन’ शाहरूखने दिली नोकरीची आॅफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 09:51 IST

किंगखान शाहरूख खान यांचा आगामी चित्रपट ‘फॅन’ वेगवेगळ्या कारणाने गाजत आहे. या चित्रपटाची शाहरूखच्या चाहत्यांना वेगळीच उत्कंठा लागून राहिली ...

किंगखान शाहरूख खान यांचा आगामी चित्रपट ‘फॅन’ वेगवेगळ्या कारणाने गाजत आहे. या चित्रपटाची शाहरूखच्या चाहत्यांना वेगळीच उत्कंठा लागून राहिली असताना यशराज फिल्मनेही ‘फॅन’ला प्रमोट करण्यासाठी कुठलीही कसर सोडलेली नाही.  त्यातच शाहरूखच्या एका चाहत्यानेही एक वेगळीच धम्माल केली आहे. शिवम जेमिनी असे शाहरूखच्या या चाहत्याचे नाव आहे. मी जगातील शाहरूखचा सर्वात मोठा फॅन आहे, असा दावा शिवमने केला आहे. आपले हे प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने ‘फॅन’ चित्रपटाचा  रि-एडिटेड ट्रेलर शाहरूखला पाठवला. ‘फॅन’ चित्रपटाच्या खºयाखुºया ट्रेलरमध्ये शिवमने स्वत:ला ‘फॅन’च्या भूमिकेत ठेवले आणि हा जिवंत ट्रेलर शाहरूखला टष्ट्वीट केला. मग??? शाहरूखला शिवमची ही कल्पना जाम आवडली आणि त्याने काय केले? अहो, त्याने चक्क शिवमला त्याच्या स्टुडिओत व्हीएफएक्स आर्टिस्ट म्हणून नोकरीचा प्रस्तावच देऊन टाकला. साक्षात शाहरूखकडून आॅफर मिळालेली पाहून शिवम चांगलाच गदगद झाला. मी कुणी प्रोफेशल व्हीएफएक्स आर्टिस्ट नाही. केवळ शाहरूखला धन्यवाद देण्यासाठी मी शक्कल लढवली एवढीच, असे शिवम यावर म्हणाला.