Join us

आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'मध्ये झाली शाहरुख खानची एन्ट्री, चाहते झाले उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 18:22 IST

Shah Rukh Khan And Aamir Khan : शाहरुख खान आणि आमिर खानला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. ही बातमी समजल्यानंतर आमिर खानसह शाहरुख खानचे चाहतेही उत्साहित झाले आहेत.

आमिर खान(Aamir Khan)चा 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा चित्रपट काही दिवसात प्रदर्शित होणार असून त्याबाबत अभिनेत्याने एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. लाल सिंग चड्ढा या चित्रपटात शाहरुख खान (Shah Rukh Khan) एका छोट्या भूमिकेत दिसणार असल्याचे आमिरने सांगितले आहे. या चित्रपटात शाहरुखची भूमिका काय असेल, याबाबत आमिरने कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, शाहरुख आणि आमिर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. हे समजल्यानंतर आमिर खानसहशाहरुख खानचे चाहतेही उत्साहित झाले आहेत.

आमिर खान म्हणाला, शाहरुख माझा चांगला मित्र आहे. जेव्हा मी त्याला सांगितले की, मी भारतात अमेरिकेच्या एल्विस (प्रेस्ली) सारखा असू शकेल असा माणूस शोधत आहे. भारताचा सर्वात मोठा स्टार असला पाहिजे. म्हणूनच मी आलो आहे. हे ऐकून त्याने लगेच या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. आमिर खान म्हणाला की त्याला भारतातील सर्वात मोठ्या आयकॉनिक स्टारची गरज आहे, म्हणून त्याने या भूमिकेसाठी शाहरुख खानशी संपर्क साधला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आमिर खान असे म्हणताना ऐकू येत आहे.

आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा हॉलिवूडपट फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे, ज्यामध्ये टॉम हँक्स मुख्य भूमिकेत दिसला होता. अद्वैत चंदन हा लाल सिंग चड्ढाचा दिग्दर्शक आहे. हा चित्रपट आमिर खान, किरण राव आणि वायाकॉम 18 मोशन पिक्चर्स यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. लाल सिंग चड्ढा या चित्रपटात आमिर खानसोबत करीना कपूर खान आणि मोना सिंग देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :आमिर खानशाहरुख खान