कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेता म्हणजे गोविंद नामदेव. बॉलिवूडसह मराठी सिनेइंडस्ट्रीत काम करणाऱ्या गोविंद नामदेव यांनी अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी बॉलिवूड आणि कलाकारांविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. अक्षय कुमारच्या सेटवरील वागणुकीविषयी भाष्य केल्यानंतर आता त्यांनी शाहरुख खानविषयी वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होतीये.
गोविंद नामदेव यांनी 'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सेटवर किंग खानचं वर्तन कसं असतं. त्याची काम करायची पद्धत कशी आहे यावर भाष्य केलं. गोविंद नामदेव आणि शाहरुख यांनी 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' या सिनेमात एकत्र स्क्रीन शेअर केली होती. २००० साली रिलीज झालेल्या या सिनेमाच्या आठवणी गोविंद नामदेव यांनी सांगितल्या.
''सिनेमाच्या सेटवर एकच व्यक्ती असा होता जो २४ तास काम करायचा. तो व्यक्ती म्हणजे शाहरुख खान. तो फक्त ३ ते ४ तास झोपायचा. बाकीच्या वेळात तो व्यायाम करतो. उद्घाटनांसाठी जातो. संवाद पाठ करुन लक्षात ठेवतो. एखाद्या कार्यक्रमामध्ये जाऊन परफॉर्मन्सही देतो. त्याचं हे सगळं शेड्यूल पाहून मी थक्क झालो.ही एक व्यक्ती एवढं सगळं कसं काय करते? हा कसा माणूस आहे," असं गोविंद नामदेव म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "त्याला अनेक शारीरिक समस्या आहेत. पाठीच्या कणाची समस्या आहे. ही समस्या खूप त्रासदायक आहे. पण, कितीही समस्या असल्या तरी कामात कसं गुंतून रहायचं हे त्याला पाहून आम्हीसुद्धा शिकलो," असं गोविंद नामदेव म्हणाले.
दरम्यान, शाहरुख सध्या किंग चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची लेक सुहाना खान, दीपिका पादुकोण आणि अभिषेक बच्चन झळकणार आहेत. हा चित्रपट 24 डिसेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Web Summary : Govind Namdev praised Shah Rukh Khan's dedication, despite physical ailments. He recalled working with Khan, highlighting his tireless work ethic and commitment to his craft, even with back problems during 'Phir Bhi Dil Hai Hindustani'. Khan's commitment was inspiring.
Web Summary : गोविंद नामदेव ने शाहरुख खान की शारीरिक समस्याओं के बावजूद उनके समर्पण की सराहना की। उन्होंने खान के साथ काम करने को याद करते हुए उनकी अथक कार्यशैली और 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' के दौरान पीठ की समस्याओं के बावजूद अपने काम के प्रति प्रतिबद्धता पर प्रकाश डाला। खान की प्रतिबद्धता प्रेरणादायक थी।