सलमानच नाही तर शाहरूख खानही लॉन्च करणार मोबाईल अॅप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2017 10:57 IST
यंदा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सलमान खानने चाहत्यांना एक मोठी भेट दिली होती. होय, सलमानने ‘बीर्इंग इन टच’ नामक एक ...
सलमानच नाही तर शाहरूख खानही लॉन्च करणार मोबाईल अॅप!
यंदा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सलमान खानने चाहत्यांना एक मोठी भेट दिली होती. होय, सलमानने ‘बीर्इंग इन टच’ नामक एक अॅप लॉन्च केली होती. या अॅपच्या माध्यमातून सलमान आपल्या चाहत्यांशी थेट जुळू इच्छित होता. खरे तर टिष्ट्वटर, फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमान त्याच्या चाहत्यांशी हितगूज करतोच. पण हे अॅप लॉन्च झाल्यापासून सलमान व चाहत्यांचा थेट संपर्क वाढला आहे. आता शाहरूख खान सुद्धा या वाटेने चालला आहे. सलमानप्रमाणेच शाहरूख सुद्धा आपल्या चाहत्यांशी थेट जुळण्यासाठी एक अॅप लॉन्च करणार आहे. या महिन्याच्या अखेरिस त्याचे हे अॅप लॉन्च होईल. तुमच्या मोबाईलवर ही अॅप उपलब्ध असेल. अलीकडे शाहरूखनने बिझनेस वाढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. माझी एक रेस्तरां चेन असावी, हे माझे स्वप्न आहे. मी मुलींसारखा बोलतोय, असे काहींना वाटेल. पण हे खरे आहे,असे शाहरूख एका मुलाखतीत म्हणाला होता. यापाठोपाठ स्वत:चे अॅप लॉन्च करण्याचा विचारही शाहरूखच्या मनात होता आणि तो त्याने अमलात आणला आहे.ALSO READ : शाहरूख खानच्या डोक्यात नवा बिझनेस प्लान; काढायचीय ‘ रेस्तरां चेन ’!सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख आपल्या अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करू इच्छितो. यासाठी आता तो अॅप लॉन्च करणार आहे. या महिन्याच्या २२ तारखेला हे अॅप लॉन्च होईल, असे कळतेय. शाहरूख सध्या सॅन फ्रॉन्सिस्कोत रंगलेल्या ६० व्या फिल्म्स फेस्टिवलमध्ये पोहोचला आहे. याठिकाणी हॉलिवूड अॅक्ट्रेस लुसिंडा निकोलस हिच्यासोबत शाहरूख दिसला. लुसिंडा लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. ‘अतिथी तुम कब जाओगे’चा सीक्वल ‘अतिथी इन लंडन’मध्ये ती दिसणार आहे. शाहरूखच्या चित्रपटांचे म्हणाल तर, तो सध्या इम्तियाज अलीच्या एका चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात तो अनुष्का शर्मासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.