Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयफोनसाठी काय पण! "मला तुझ्याशी लग्न करायचंय" असं गौरीला नाही तर कुणाला म्हणाला होता शाहरुख खान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 10:18 IST

शाहरुख खान यानं रात्री ११ वाजता फोनवर कुणाला केलं होतं प्रपोज, जाणून घ्या...

 Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान याच्याबद्दलचे सगळेच फॅन आहेत. त्याच्या अभिनयाचं, त्याच्या मेहनतीचं नेहमीच कौतुक होतं. शाहरुख खान त्याच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखला जातो. अभिनेत्याची विनोदबुद्धीदेखील खूप चांगली आहे. त्यांच्या मैत्रीची चर्चा संपूर्ण बी टाउनमध्ये होते. तसेच त्याच्याबद्दलचे अनेक किस्सेही इंडस्ट्रीत सांगितले जातात. असाच एक किस्सा सध्या चर्चेत आलाय. 

शाहरुख खान अभिनेता रितेश देशमुख ( Riteish Deshmukh ) आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा यांच्याशी जवळचं नातं आहे. दोघेही बऱ्याच लग्न आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का? एकदा शाहरुख खानने थेट रितेशला "मला तुझ्याशी लग्न करायचं आहे" असं म्हटलं होतं. मात्र, यामागील कारण जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. 

रितेश देशमुखनं मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखबद्दलचा एक किस्सा सांगितला होता.  हा तो काळ आहे, जेव्हा भारतात आयफोन नुकताच लाँच झाला होता. तेव्हा रितेशने स्वतःसाठी दोन आयफोनची व्यवस्था केली होती. यापैकी एक आयफोन त्यानं शाहरुख खानला भेट म्हणून दिला होता. रितेशने मुलाखतीत सांगितले की, "मला आठवतंय शाहरुखचा ११ वाजता फोन आला आणि तो मला म्हणाला,  "अरे हे काय मित्रा, हे तर खूपच छान आहे". रितेशचं गिफ्ट शाहरुखला प्रचंड आवडलं आणि  मस्करीत  "मला तुझ्याशी लग्न करायचं आहे", असं शाहरुखने म्हटलं. यावर रितेश आणि शाहरुखदोघेही हसायला लागले. 

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लाडकी लेक मुलगी सुहाना खान आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यासोबत आगामी क्राइम-थ्रिलर 'किंग' सिनेमामध्ये दिसणार आहे. तर अभिनेता रितेश देशमुख शेवटचा "बिग बॉस मराठी ५" होस्ट करताना दिसला होता. तर लवकरच तो 'हाऊसफुल ५' मध्ये पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :शाहरुख खानरितेश देशमुख