किंग खान शाहरुखसाठी 2023 वर्ष हे खूप खास ठरलं. वर्षाच्या सुरुवातीला 'पठाण' आणि त्यानंतर 'जवान' सिनेमाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. आता त्याचा तिसरा चित्रपट 'डंकी' देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. एकाच वर्षात किंग खानचा तिसरा चित्रपट पाहायला मिळणार असल्याने चाहते खूप उत्साहित आहेत. अशा परिस्थितीत शाहरुखच्या चाहत्यांसाठी आम्ही त्याच्या आगामी चित्रपटांची यादी घेऊन आलो आहोत. तर पाहूयात कोणत्या-कोणत्या चित्रपटांमधून शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'डंकी''पठान' आणि 'जवान' चित्रपटाच्या अफाट यशानंतर शाहरुख खान 'डंकी' चित्रपटात दिसणार आहे. 'मुन्ना भाई M.B.B.S' चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी 'डंकी'चे दिग्दर्शन केले आहे. 22 डिसेंबर ला 'डंकी' रिलीज होतोय. 'पठान' आणि 'जवान' चित्रपटापेक्षा खूप वेगळ्या जॉनरचा 'डंकी' चित्रपट असेल. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला आहे.
'टायगर 3''डंकी' चित्रपटापूर्वीच प्रेक्षकांना सलमान खानच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'टायगर 3'मध्ये शाहरुख खानची झलक दिसणार आहे. दिग्दर्शक मनीष शर्माच्या या स्पाय थ्रिलर चित्रपटात 'पठाण' आणि टायगरच्या जोडीचा धमाका चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. मात्र, शाहरुख 'टायगर 3' मध्ये छोट्या भूमिकेत दिसणार आहे. 'टायगर 3' येत्या दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
जवान 2या यादीत शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान'च्या सिक्वेलचेही नाव आहे. जर तुम्ही ॲटली दिग्दर्शित जवान पाहिला असेल, तर तुम्ही चित्रपटाच्या शेवटच्या दृश्य देखील पाहिले असेल. ज्यात आझाद त्याचे वडील विक्रम राठोड यांना दुसऱ्या मिशनबद्दल सांगतो. अर्थात भविष्यात चाहत्यांना 'जवान 2' बघायला मिळू शकतो. मात्र, या प्रकरणाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.