Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख खानने ट्विट करून फराह खानला म्हटले, ‘तू माझे शोषण केले’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 21:54 IST

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानने ट्विटरवर त्याची खास मैत्रिण फराह खानला ‘तू माझे शोषण केले’ असे म्हटले आहे. शाहरूख खानने ...

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानने ट्विटरवर त्याची खास मैत्रिण फराह खानला ‘तू माझे शोषण केले’ असे म्हटले आहे. शाहरूख खानने फराहला असे तेव्हा म्हटले जेव्हा तिने त्याचा एक फोटो शेअर केला. त्याचे झाले असे की, गुरुवारी फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण झाले. यानिमित्त चित्रपटाशी संबंधित बºयाचशा कलाकारांनी सोशल मीडियावर चित्रपटासंबंधी आठवणींना उजाळा दिला. फराह खान, दीपिका पादुकोण, शाहरूख खानसह शिरीष कुंदरने या चित्रपटाशी संबंधित काही मोमेंट्स शेअर केल्या. फराहने शाहरूखचा एक शर्टलेस फोटो ट्विटरवर पोस्ट केला. कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तू माझ्या सांगण्यावरून शर्ट काढला अन् पुढे तो ट्रेंड सेट केला. धन्यवाद!’असे म्हटले जाते की, शाहरूखने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील ‘दर्दे डिस्को’ या गाण्यात शर्टलेस होऊन सर्वांत अगोदर त्याचे सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखविले. असे समजले जाते की, या गाण्यानंतरच बॉलिवूडमध्ये शर्टलेस होण्याचा ट्रेंड सुरू झाला. कारण शाहरूखनंतर बºयाचशा कलाकारांनी शर्टलेस होत त्यांचे सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखविले. हीच आठवण यावेळी फराहने करून दिली.  पुढे शाहरूखनेही फराहच्या या ट्विटला उत्तर दिले. त्याने लिहिले की, ‘मी हे अगोदरच स्पष्ट केले की, हे सगळं मी केवळ तुझ्यासाठी केले होते. तुझ्या व्यतिरिक्त दुसरे कोणी असते तर कदाचित मी हे करू शकलो नसतो.’ शाहरूखने पुढे लिहिले की, जसे की ट्रॉम क्रूजनेही म्हटले होते की, ‘तू माझे शोषण केले’ शाहरूखच्या या ट्विटनंतर त्याच्या चाहत्यांनीही त्याला रिट्विट केले.