Join us

प्रियंकासोबत अफेअरच्या चर्चांवर किंग खाननेच दिलं होतं उत्तर, म्हणाला, 'ज्या मुलीने माझ्यासोबत ...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 17:10 IST

प्रियंकासोबतच्या लिंकअपवर शाहरुखने एका मुलाखतीत थेट उत्तर दिलं होतं.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा काही वर्षांपूर्वी तेजीत होत्या. 'डॉन 2' नंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली होती. शाहरुखचं पत्नीवर गौरीवर किती प्रेम आहे हे सगळ्यांनाच माहित होतं. तरी या चर्चांमुळे चाहतेही संभ्रमात पडले. प्रियंकासोबतच्या लिंकअपवर शाहरुखने एका मुलाखतीत थेट उत्तर दिलं होतं. त्याचा व्हिडिओ  आता व्हायरल होतोय. 

'जब तक है जान' सिनेमाच्या प्रमोशनवेळी शाहरुख खानला प्रश्न विचारण्यात आला की त्याचं नाव आजपर्यंत कधीच कोणासोबत जोडलं गेलं नाही पण आता प्रियंकासोबतच्या चर्चांमुळे चाहत्यांना काय  उत्तर देशील? यावर तो म्हणाला,'मला या गोष्टीचं वाईट वाटलं की ज्या मुलीने माझ्यासोबत काम केलं तिला विचित्र प्रश्न विचारण्यात आले. मला तिची माफी मागायची आहे. माफी मागतोय म्हणजे मी काही केलंय असं नाही तर ती माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे आणि राहील. या गोष्टी मला खूपच छोट्या वाटतात. यामुळे नाती खराब होतात.'

तो पुढे म्हणाला, 'ती खूप छान मुलगी आहे. मी तिला मिस वर्ल्ड क्राऊनिंग सेरेमनीत बघितलं आहे. आम्ही ऑनस्क्रीन छान काम केलं आहे.  हे खूप वाईट आहे की अशा चर्चांमुळे मैत्री बिघडते. पण ती खूप समजूतदार मुलगी आहे. त्यामुळे आमच्यात आजही मैत्री आहे. पण लोकांनी काहीही विचार न करता नाव जोडणं वाईट आहे.'

शाहरुख-प्रियंकाच्या या चर्चांनंतर प्रियंका हॉलिवूडमध्ये सेटल झाली. तिला तिचा जोडीदारही मिळाला. तिने सरोगसीच्या माध्यमातून मालती मेरी या मुलीला जन्म दिला. तर शाहरुखही पुन्हा मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवत आहे.

टॅग्स :शाहरुख खानप्रियंका चोप्रारिलेशनशिपबॉलिवूड