Join us  

आकाश अंबानीच्या संगीत सेरेमनीमधील शाहरुख खान आणि गौरी खानचा डान्स तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 1:08 PM

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांची संगीत सेरेमनी स्वित्झलँडमध्ये नुकतीच झाली असून या समारंभाला देश-विदेशातील अनेक सेलिब्रेटी हजर होते आणि त्यांनी त्यांचे परफॉर्मन्स देखील सादर केले.

ठळक मुद्देआकाशच्या संगीत सेरेमनीतील एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आपल्याला शाहरुख खान आणि गौरी खान थिरकताना दिसत आहेत. या व्हिडिओत कोल्ड प्लेचा क्रिस मार्टिन पियानो वाजवताना आणि गाताना दिसत आहे. त्याचे गाणे सुरू होताच शाहरुख खान स्टेजवर येऊन त्याला अलिंगन देताना आणि त्याच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्याच्यानंतर लगेचच शाहरुखची पत्नी गौरी, आलिया भट्ट देखील त्याच्या गाण्यावर शाहरुखसोबत डान्स करताना दिसत आहेत.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता या दोघांचा साखरपुडा गेल्या वर्षी ३० जूनला झाला होता. श्लोका मेहता ही आकाशची बालमैत्रीण असून त्या दोघांचे शिक्षण धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकत्र झाले आहे. श्लोका ही रसेल मेहता या डायमंड उद्योजकाची मुलगी आहे. या दोघांच्या साखरपुड्याआधी मेहंदी, प्री- एंजेगमेंट पार्टी पार पडली होती. यानंतर अंबानींच्या एंटिलियामध्ये अगदी थाटामाटात, धुमधडाक्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. आता या दोघांचे लग्न ९ मार्चला होणार असून या लग्नाची जोरदार तयारी अंबानी कुटुंबिय करत आहे. त्यांचे एंटिलिया हे घर सजवायला देखील सुरुवात झाली आहे. आकाश आणि श्लोका यांचे लग्न आणि रिसेप्शन दोन्ही मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. बॉलिवूड, राजकारण, खेळ, व्यवसाय अशा विविध क्षेत्रातील दिग्गज लग्नाला आणि रिसेप्शनला हजेरी लावणार आहेत. 

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांची संगीत सेरेमनी स्वित्झलँडमध्ये नुकतीच झाली असून या समारंभाला देश-विदेशातील अनेक सेलिब्रेटी हजर होते आणि त्यांनी त्यांचे परफॉर्मन्स देखील सादर केले. कोल्ड प्ले आणि द चेनस्मोकर्स यांच्या टीमने देखील परफॉर्मन्स सादर केला. आकाशच्या संगीत सेरेमनीतील एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आपल्याला शाहरुख खान आणि गौरी खान थिरकताना दिसत आहेत. या व्हिडिओत कोल्ड प्लेचा क्रिस मार्टिन पियानो वाजवताना आणि गाताना दिसत आहे. त्याचे गाणे सुरू होताच शाहरुख खान स्टेजवर येऊन त्याला अलिंगन देताना आणि त्याच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्याच्यानंतर लगेचच शाहरुखची पत्नी गौरी, आलिया भट्ट देखील त्याच्या गाण्यावर शाहरुखसोबत डान्स करताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर आकाश, श्लोका आणि आकाशची आई नीता अंबानी यांनी देखील मार्टिनच्या गाण्यावर ताल धरला असल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे. 

शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूर, अलिया भट, करण जोहर, अर्जुन कपूर, मलाईका अरोरा, करिश्मा कपूर, विद्या बालन, जॅकलिन फर्नांडिस हे बॉलिवूडमधील सेलिब्रेटी तर सचिन तेंडुलकर, जहीर खान, हरभजन सिंग, युवराज सिंग, यांसारखे क्रिकेटर आकाश-श्लोकाच्या संगीत सेरेमनीसाठी स्वित्झलँडला गेले होते.

टॅग्स :आकाश अंबानीआकाश अंबानी लग्न