Join us
Daily Top 2Weekly Top 5

अन् शाहरुख खान भेटला नाही म्हणून ‘त्याने’ स्वत:वर केले ब्लेडचे वार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 11:44 IST

गत रात्री शाहरुख खानच्या बंगल्यावर दिवाळी पार्टी रंगली. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली. पण ही पार्टी रंगात आली असतानाच अचानक एक धक्कादायक बातमी आली.

गत रात्री शाहरुख खानच्या बंगल्यावर दिवाळी पार्टी रंगली. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली. पण ही पार्टी रंगात आली असतानाच अचानक एक धक्कादायक बातमी आली. होय, शाहरूखच्या ‘मन्नत’ या बंगल्याबाहेर एका चाहत्याने स्वत:वर ब्लेड वार करत, स्वत:ला जखमी करून घेतले. कोलकात्यावरून आलेल्या या चाहत्याचे नाव सलीम असल्याचे कळतेय.

शाहरुखच्या वाढदिवसाला त्याला भेटण्यासाठी सलीम मुंबईत आला होता. शाहरुख आत्ता भेटेल, मग भेटेल, असे करत तो अनेक तास ‘मन्नत’ बाहेर ताटळत राहिला. पण अनेक तास प्रतीक्षा केल्यानंतर अचानक त्याने स्वत:वर ब्लेडने वार केलेत. यात तो गंभीर जखमी झाला. यामुळे पोलिसही तणावात आले. त्याने लगेच त्याला ताब्यात घेत, जवळच्या रूग्णालयात भरती केले.या घटनेनंतर काहीच क्षणात जान्हवी कपूर ही ईशान खट्टरसोबत ‘मन्नत’मधून बाहेर पडली. यादरम्यान अनेकांनी तिच्या गाडीला घेराव घातला. जान्हवीची एक झलक पाहण्यासाठी हे सगळे चाहते उत्सूक होते. अखेर या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. शाहरुखची दिवाळी पार्टी शनिवारी रात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत सुरू होती. यामुळे काल रात्रभर ‘मन्नत’ बाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.शाहरूखचा ‘झिरो’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होताय. २ नोव्हेंबरला शाहरूखने या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला. या चित्रपटात शाहरुखशिवाय कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :शाहरुख खान