Join us
Daily Top 2Weekly Top 5

​क्रिकेटच्या मैदानावर शाहरूख खानने लेकीसोबत केली धम्माल मस्ती! पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 12:17 IST

शाहरूख खान लेक सुहाना खान हिच्यावर किती प्रेम करतो, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. काल रात्री कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावरही ...

शाहरूख खान लेक सुहाना खान हिच्यावर किती प्रेम करतो, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. काल रात्री कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावरही बापलेकीतील याच प्रेमाचे दर्शन घडले.काल ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट राइडर्स(केकेआर) या  शाहरूखच्या मालकीच्या क्रिकेट टीमने आपला पहिला  आयपीएल सामना खेळला. आपल्या टीमला चीअर अप करण्यासाठी किंगखान शाहरूख स्वत: मैदानावर होता.यावेळी सुहानाही त्याच्यासोबत दिसली.  केवळ सुहानाच नाही तर शाहरूखची पत्नी गौरी खान ही सुद्धा तिच्या संपूर्ण गर्ल गँगसोबत ईडन गार्डन्सवर हजर होती. साहजिकच कालच्या संपूर्ण सामन्यात कॅमे-याचा रोख किंगखान आणि त्याच्या कुटुंबावर होता.सुहाना व शाहरूख हे दोघे बाप-लेक तर जणू  सर्वांत मोठे सेलिब्रिटी होते.  शाहरूख व सुहाना दोघेही सामन्यादरम्यान धम्माल मस्ती करताना दिसले.  दोघांमधील बॉन्डिंगही यावेळी स्पष्टपणे दिसली.केकेआरने मॅच जिंकताच सुहानाने डॅडला घट्ट अलिंगण दिले, तो क्षणही कॅमे-यांनी टिपला. एकंदर काय तर सुपर कुल डॅडसोबत सुहानाचा दिवस अगदी झक्कास गेला. डॅडही सुखावला अन् सुहानाही सुखावली. सोबतच पहिलाच सामना जिंकल्याने दोघांचाही आनंद द्विगुणित झाला.  येत्या काही दिवसांत शाहरूख खान ‘झीरो’ या चित्रपटात आणखी बिझी होणार आहे. त्यामुळेच तो केकेआरचा पहिला सामना पाहायला पोहोचला. यापूर्वीच्या अनेक सीझन्समध्ये शाहरूख आपल्या टीमला चिअर अप करताना दिसला आहे.  ALSO READ : शॉर्ट ड्रेसमध्ये आजीसोबत फोटो काढणाºया सुहाना खानला यूजर्सनी सुनावले!मुंबईच्या धीरूबाई अंबानी स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी सुहानाने लंडनची निवड केली आहे. सुहानाचा भाऊ आर्यन खान हा सुद्धा सध्या लंडनमध्येच शिकतो आहे.  डान्सिंग आणि स्पोर्ट तिचे आवडीचे विषय. सुहानाने एक डान्सर म्हणून नाव कमवावे, असे शाहरूखला वाटतेय. अर्थात सुहानाने अभिनय क्षेत्रात यावे, यालाही शाहरूखची ना नाहीय. तसेही सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा जोरात सुरु झाल्या आहेत. अलीकडे शाहरूखची लाडकी लेक सुहाना एक उत्तम अभिनेत्री बनणार, मोठे नाव कमावणार, असे भाकीत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी  यांनी वर्तवले होते. शाहरूख व गौरी खान यांनी २५ आॅक्टोबर १९९१ मध्ये लग्न केले होते. १९९७ मध्ये या दोघांचा मोठा मुलगा आर्यन याचा जन्म झाला होता. यानंतर २०००मध्ये सुहाना जन्मली होती. सन २०१३ मध्ये शाहरूख व गौरीचा तिसरा  मुलगा अबराम याचा जन्म झाला होता. अर्थात अबरामचा जन्म सरोगसीद्वारे झाला होता.