Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख खानच्या दिवाळी पार्टीत आमिर, करिना, कॅटरिनासह अनेकांची हजेरी, पाहा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 11:24 IST

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने गतरात्री आपल्या ‘मन्नत’ या बंगल्यावर एकाचवेळी बर्थ डे व दिवाळी पार्टी दिली. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने गतरात्री आपल्या ‘मन्नत’ या बंगल्यावर एकाचवेळी बर्थ डे व दिवाळी पार्टी दिली. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. आमिर खान, संजय लीला भन्साळी, करिना कपूर, आलिया भट्ट, कॅटरिना कैफ, जॅकी श्रॉफ असे अनेक स्टार्स या पार्टीत दिसले.

गत २ नोव्हेंबरला शाहरूखचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी शाहरूखने आपल्या आगामी ‘झिरो’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला. यानंतर दुसऱ्या दिवशी शाहरूखने ‘मन्नत’वर बर्थ डे कम दिवाळी पार्टी दिली. यावेळी मन्नत अगदी नववधूप्रमाणे सजवण्यात आला होता. या पार्टीत शाहरूख ब्लॅक शेरवानीत दिसला आणि गौरी ब्लॅक कलरच्या स्टाईलिश लहंग्यात दिसली. सुहानाने ब्लॅक कलरच्याच स्टाईलिश ड्रेसमध्ये दिसली.पाहुया या पार्टीचे काही फोटो...

टॅग्स :शाहरुख खान