शाहरुख खान आणि इम्तियाज अलीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव झाले लीक; काय असेल ते नाव, तुमचा काही अंदाज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:43 IST
एकेकाळचे जीवलग मित्र, नंतर कट्टर वैरी आणि आता पुन्हा जीवाभावाचे मित्र बनलेले सलमान आणि शाहरुख खान एकमेकांच्या चित्रपटाचे प्रोमोशन ...
शाहरुख खान आणि इम्तियाज अलीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव झाले लीक; काय असेल ते नाव, तुमचा काही अंदाज?
एकेकाळचे जीवलग मित्र, नंतर कट्टर वैरी आणि आता पुन्हा जीवाभावाचे मित्र बनलेले सलमान आणि शाहरुख खान एकमेकांच्या चित्रपटाचे प्रोमोशन करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शाहरुख करीत असलेल्या इम्तियाज अली दिग्दर्शित आगामी चित्रपटाचे पोस्टर सलमानने ट्विटरवर शेअर करून टायटल सुचवण्यास सांगितले होते.भाईजानने सांगितले म्हटल्यावर सोशल मीडियावर नावांचा पाऊस पडला. यामध्ये सेलिब्रेटीसुद्धा मागे नव्हते. करण जोहरने ट्विट करून शाहरुखला म्हटले की, एक तर मी सुचवलेले नाव निश्चित कर किंवा आलियाचे नावसुद्धा चांगले आहे.अनुष्का शर्मानेसुद्धा याबाबत बरेच वातावरण तयार केले. आतापर्यंत या चित्रपटाला ‘द रिंग’ या नावाने ओळखले जाई मात्र नाव गुप्त ठेवून सिनेमाबद्दल उत्सुकता वाढवण्याचा निर्मात्यांचा प्लॅन आता फसला. कारण या चित्रपटाचे नाव इंटरनेटवर लीक झाले आहे. तुमचा काही ‘गेस’, काय असेल ते नाव?आम्हीच सांगतो. शाहरुख-अनुष्का स्टारर या सिनेमाचे नाव ‘रहनुमा’ आहे. एका इंग्रजी दैनिकाने सुत्रांच्या माहितीनुसार हे वृत्त दिले आहे. ‘रहनुमा’ या उर्दू शब्दाचा अर्थ होतो ‘वाट दाखवणारा’. इंग्रजीमध्ये सांगायचे तर ‘गाईड’. काही आठवले?हा चित्रपट देव आनंदच्या ‘गाईड’ चित्रपटाचा रिमेक किंवा त्यावरून इन्स्पायर आहे असे बोलले जायचे. ‘रहनुमा’ या नावावरून तरी तसेच वाटतेय. आता या चित्रपटाला इम्तियाज अलीचा स्पेशल टच असणार एवढे नक्की. यामध्ये शाहरुख युरोपमध्ये गाईडची भूमिका साकारत आहे. अनुष्का जेव्हा युरोप फिरायला जाते तेव्हा तिची भेट त्याच्याशी होते आणि विविध प्रेक्षणीय स्थळे तिला दाखवताना त्यांचे प्रेम फुलते.‘जब वुई मेट’, ‘रॉकस्टार’, ‘तमाशा’ अशा चित्रपटांचा दिग्दर्शक इम्तियाजला शाहरुखसोबत काम करण्याची बºयाच वर्षांपासून इच्छा होती. हा चित्रपट आपण खास त्याच्यासाठी लिहिला असल्याचे त्याने सांगितले. जानेवारी महिन्यात शूटींग पूर्ण होत असून त्यानंतर ११ आॅगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.