टेलिव्हिजन ते चित्रपट असा प्रवास करणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan)चा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट दीवाना (१९९२) होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) मुख्य भूमिकेत होते. याआधीही शाहरुखने अनेक चित्रपट साइन केले होते, पण योगायोगाने हा त्याचा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट ठरला.
'दीवाना' चित्रपटाचे निर्माते गुड्डू धनोआ सांगतात, ''जेव्हा मी शाहरुखशी माझ्या 'दीवाना' चित्रपटासाठी संपर्क साधला, तेव्हा त्याच्याकडे आधीच पाच चित्रपट होते. त्याने आम्हाला भेटण्यासाठी दिल्लीला बोलावले. तिथे एका रेस्टॉरंटमध्ये त्याच्यासोबत मीटिंग झाली, तेव्हा तो म्हणाला की माझ्याकडे तर तारखाच नाहीयेत. मी विचारले की, तू असे काय करत आहेस? तेव्हा त्याने सांगितले की, मी पाच चित्रपट करत आहे. मग मी म्हणालो की, तुम्ही चित्रपटाची कथा तरी ऐका.''
शाहरुखची पहिली सॅलरी गुड्डू धनोआ पुढे म्हणाले, ''कथा ऐकण्यासाठी त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या घरी बोलावले. त्याच्या घरी कथेचा सेकंड हाफ ऐकल्यानंतर तो म्हणाला की, गुड्डू मी हा चित्रपट करत आहे. मी त्यांना ११ हजार रुपये साइनिंग अमाऊंट दिली. त्यावेळी त्याने मला सांगितले होते की, 'या पाचही चित्रपटांमधून कोणाची तारीख कॅन्सल झाली, तरच मी तुमच्या चित्रपटासाठी तारीख देऊ शकेन.' त्यानंतर एक दिवस आम्हाला त्याच्याकडून फोन आला की, 'राजू बन गया जेंटलमैन' या चित्रपटाचे २० दिवसांचे शूटिंग शेड्यूल कॅन्सल झाले आहे. आम्ही योजना आखली आणि शूटिंग सुरू केली. ज्या चित्रपटासाठी शाहरुखकडे तारखा नव्हत्या, तोच चित्रपट सर्वात आधी प्रदर्शित झाला. यात कोणतीही रणनीती नव्हती, आमचा चित्रपट सर्वात आधी बनला होता, म्हणून सर्वात आधी प्रदर्शित झाला. कोणीतरी मला सांगितले होते की, शाहरुखचा निर्मात्यांशी करार आहे की त्यांचा 'राजू बन गया जेंटलमैन' हा चित्रपट सर्वात आधी प्रदर्शित होईल. ''
किंग खानचा डेब्यू चित्रपट कोणता?''मी शाहरुखशी याबद्दल बोललो. तो म्हणाला की,'जर तुमचा चित्रपट तयार असेल, तर तुम्ही सर्वात आधी तो प्रदर्शित करा.' चित्रपटाचे संगीत तर आधीच हिट झाले होते, मग चित्रपटही हिट झाला. चित्रपटात ऋषी जी आहेत हे ऐकून शाहरुख खूप खूश झाला होता. तो म्हणाला होता की, मला तर ऋषी सर यांच्यासोबत काम करायचे आहे. मला आठवतंय की सेटवर त्याच्यामध्ये खूप ऊर्जा असायची, जी आजही आहे.'', गुड्डू धनोआ यांनी सांगितले.
'दीवाना' शिवाय शाहरुखचा इतिहास अपूर्णते पुढे म्हणाले की, ''चित्रपटाचा पहिला शॉटच शाहरुखचा सोलो शॉट होता. ज्यामध्ये तो कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये आपल्या मित्रांसोबत बसलेला असतो. 'दीवाना'चे तीन निर्माते होते, मी (गुड्डू धनोआ), ललित कपूर आणि राजू कोठारी. शाहरुखचा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट आमचा आहे याचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा कधी शाहरुखचा इतिहास लिहिला जाईल किंवा त्याच्या चित्रपटांबद्दल लिहिले जाईल, तेव्हा 'दीवाना' शिवाय तो अपूर्ण असेल.''
''यावर्षी जेव्हा त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला, तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. या चित्रपटानंतर पुन्हा त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. तरीही, 'दीवाना'मध्ये खूप मजा आली. त्याच्या या वाढदिवसानिमित्त मी त्यांच्यासाठी हेच म्हणू इच्छितो की, देव त्याला खूप मोठे आयुष्य, खूप सारे आनंद, निरोगी जीवन आणि खूप सारे पैसे देवो. पैसे तसेही त्याच्याकडे खूप आहेत.'', असेही ते म्हणाले.
Web Summary : Shah Rukh Khan's debut film 'Deewana' happened unexpectedly. He initially had no dates, accepting it only if another film's schedule changed. He received ₹11,000 signing amount. The film became a hit, with Rishi Kapoor also starring.
Web Summary : शाहरुख खान की पहली फिल्म 'दीवाना' अप्रत्याशित रूप से हुई। उनके पास शुरू में तारीखें नहीं थीं, उन्होंने तभी स्वीकार किया जब दूसरी फिल्म का शेड्यूल बदल गया। उन्हें ₹11,000 साइनिंग राशि मिली। ऋषि कपूर के साथ फिल्म हिट रही।