Join us

रवीना टंडन यांची मुलगी छाया विवाहबध्द्

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:41 IST

 अभिनेत्री रवीना टंडन ची लहान कन्या छाया हिने गोवा शहरात विवाह केला. रविना यांनी विवाहची छायाचित्रे ट्विटर या सोशल ...

 अभिनेत्री रवीना टंडन ची लहान कन्या छाया हिने गोवा शहरात विवाह केला. रविना यांनी विवाहची छायाचित्रे ट्विटर या सोशल साईट वर शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये छाया आणि रवीना दोघेही आकर्षक दिसत आहेत. छाया आणि तिचे पती शॉन मेंडिस यांनी हिंदू आणि ख्रिस्ती (कॅ थॉलिक) रीतिरीवाजानूसार विवाह केला. यावेळी छाया हिची मोठी बहीण पूजा आणि आई अभिनेत्री रविना टंडन या उपस्थित होत्या. गेल्या २५ जानेवारीला हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. पूजा आणि छाया या रवीना टंडन यांनी दत्तक घेतलेल्या मुली आहेत. रविना यांनी आपल्या अभिनयाच्या करिअरआगोदरच या दोघींना दत्तक घेतले होते. पूजा हिचा विवाह यापुर्वीच पार पडला आहे. रवीना यांचा विवाह अनिल ठाडानी यांच्याशी झाला असून या दाम्पत्याला दोन अपत्ये आहेत. राशा आणि रनबीर.