Join us
Daily Top 2Weekly Top 5

शबाना आझमींनी नसीरूद्दीन शाह यांना म्हटले होते, ‘अशा चेहऱ्याचे लोक हिरो होण्याची हिम्मत तरी कशी करतात?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 20:59 IST

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह आजही बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्संना टक्कर देण्यास दम ठेवतात. ‘इश्किया, राजनिती, जिंदगी ना मिलेगी ...

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह आजही बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्संना टक्कर देण्यास दम ठेवतात. ‘इश्किया, राजनिती, जिंदगी ना मिलेगी दोबारा, बेगमजान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून त्यांनी हे सिद्धही केले आहे. मात्र एक काळ असाही होता, जेव्हा नसीरुद्दीन यांना इंडस्ट्रीत काम मिळत नव्हते. त्यावेळी त्यांना असेही वाटले की, बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय चुकीचा तर नाही ना? मात्र अशातही ते न डगमगता मेहनत करीत राहिले. अखेर पुढे त्यांची मेहनत सार्थकी लागली. आज त्यांना बॉलिवूडचे यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जाते. वास्तविक नसीरुद्दीन शाह सुरुवातीपासूनच सिम्पल लूकवाले अभिनेता आहेत. ज्यामुळे त्यांना लोकांच्या विचित्र कॉमेण्ट्सचा सामनाही करावा लागला. हा किस्सा तेव्हाचा आहे, जेव्हा नसीरुद्दीन शाह दिल्लीतील एनएसडीमध्ये शिक्षण घेत होते. त्यावेळी नसीरुद्दीन यांना बघून शबाना आझमी यांनी म्हटले होते की, ‘मला आश्चर्य होते की, अशा चेहºयाचे लोक अभिनेता बनण्याची हिम्मत तरी कसे करतात? त्यावेळी शबाना यांनी नसीरुद्दीन यांना सल्ला दिला होता की, असा कू्रर चेहरा घेऊन चुकूनही अभिनेता होण्याचे स्वप्न बघू नकोस. त्यावेळी नसीरुद्दीन यांनी शबाना यांचा सल्ला फारसा जिव्हारी लावून न घेता मेहनत करणे कायम ठेवले. पुढे नसीरुद्दीन यांनी त्याच शबाना आझमी यांच्याबरोबर ‘निशांत’ हा पहिला चित्रपट केला. ज्यामध्ये शबाना यांच्यापेक्षा नसीरुद्दीन यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले गेले. या चित्रपट सुपरहिट ठरला, शिवाय त्यास नॅशनल अवॉर्डही मिळाला. त्यानंतर शबाना आझमी यांनी नसीरुद्दीन शाह यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. शिवाय त्यांनी हेदेखील दाखवून दिले की, जर तुमच्यात स्वत:ला सिद्ध करण्याची हिम्मत असेल तर चेहराच सर्व काही नाही. तुमच्यातील कमजोरीला जर तुम्ही तुमची ताकद बनविली तर तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकता.