बॉलिवूडमध्येअनेक दिग्गज घराणी आहेत, ज्यांच्या कौटुंबिक नात्यांबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना नेहमीच मोठी उत्सुकता असते. हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाचा आणि लेखणीचा ठसा उमटवणाऱ्या शबाना आझमी यांच्या कुटुंबाचे 'मराठी कनेक्शन' सध्या चर्चेत आहे. शबाना आझमींच्या घरात केवळ हिंदी किंवा उर्दूचाच प्रभाव नाही, तर त्यांच्या कुटुंबात दोन अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती या मूळच्या महाराष्ट्रीयन आहेत. शबाना आझमींची वहिनी आणि सून या दोन्ही अभिनेत्री मराठी आहेत.
शबाना आझमी यांचे भाऊ आणि प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी यांची पत्नी अभिनेत्री तन्वी आझमी या मूळच्या मराठी आहेत. तन्वी आझमी या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा किरण यांच्या कन्या आहेत. लग्नापूर्वी त्यांचे नाव सौहिती खेर होते. शबाना आणि तन्वी या केवळ नणंद-भावजय नसून एकमेकींच्या सर्वोत्तम मैत्रिणी आहेत. अनेक कार्यक्रमांत त्या एकत्र दिसतात आणि शबाना नेहमीच तन्वी यांच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसतात.
एका मुलाखतीत तन्वी यांनी आपल्या लग्नावेळचा एक रंजक किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या, "मी खूप आज्ञाधारक मुलगी होते, पण माझ्या रक्तात सुप्त बंडखोरपणा होता. जेव्हा एका महाराष्ट्रीयन ब्राह्मण मुलीने (मी) मुस्लीम पुरुषाशी लग्न केलं, तेव्हा संपूर्ण मुंबईत जणू काही उद्रेक झाला होता. लोकांसाठी तो जगाचा अंत वाटत होता, पण माझ्यासाठी तिथूनच खरी बंडखोरी सुरू झाली".
तन्वी आझमी यांच्या कुटुंबातील अभिनयाचा वारसा पुढेही सुरू आहे. अभिनेत्री सैयामी खेर ही तन्वी आझमींचे भाऊ अद्वैत खेर यांची मुलगी आहे. म्हणजेच उषा किरण या सैयामी खेरच्या आजी आणि तन्वी आझमी तिची आत्या आहेत. सैयामी अनेकदा आपल्या आत्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सूनही आहे महाराष्ट्रीयन!शबाना आझमी यांची केवळ वहिनीच नाही, तर सूनदेखील मराठी आहे. शबाना आणि जावेद अख्तर यांचा मुलगा फरहान अख्तर याने मराठमोळ्या शिबानी दांडेकरशी दुसरे लग्न केले आहे. शबाना आझमी या फरहानच्या सावत्र आई असल्या तरी, शिबानी आणि त्यांच्यात खूप प्रेमळ नाते आहे. अशा प्रकारे, आझमी आणि अख्तर कुटुंबात मराठी संस्कृतीचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो.
Web Summary : Shabana Azmi's family has a strong Marathi connection. Her sister-in-law, Tanvi Azmi, and daughter-in-law, Shibani Dandekar, are both Maharashtrian actresses. Tanvi is the daughter of actress Usha Kiran. The family embraces Marathi culture.
Web Summary : शबाना आजमी के परिवार का मराठी संस्कृति से गहरा नाता है। उनकी भाभी, तन्वी आजमी, और बहू, शिबानी दांडेकर, दोनों ही महाराष्ट्रीयन अभिनेत्रियाँ हैं। तन्वी, अभिनेत्री उषा किरण की बेटी हैं। परिवार मराठी संस्कृति को अपनाता है।