‘मोहल्ला अस्सी’वरून सेन्सॉर बोर्ड वांद्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 20:10 IST
आक्षेपार्ह भाषेवरून ‘मोहल्ला अस्सी’ हा सनी देओल व साक्षी तन्वर यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट वांद्यात सापडला आहे. आता ...
‘मोहल्ला अस्सी’वरून सेन्सॉर बोर्ड वांद्यात
आक्षेपार्ह भाषेवरून ‘मोहल्ला अस्सी’ हा सनी देओल व साक्षी तन्वर यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट वांद्यात सापडला आहे. आता या चित्रपटावरून सेन्सॉर बोर्ड ही वांद्यात सापडण्याची चिन्हे आहेत. इतकी आक्षेपार्ह भाषा असताना हा चित्रपट व त्याचे प्रमोज पास झालेच कसे? असा सवाल करीत कोर्टाने सेन्सॉर बोर्डाला नोटीस जारी केले आहे. ३० जूनपर्यंत या नोटीस उत्तर देण्याचे कोर्टाने बोर्डाला बजावले आहे.हिंदू फ्रंट फॉर जस्टिस नावाच्या एका स्वयंसेवी संघटनेने या चित्रपटाविरूद्ध याचिका दाखल केली होती. हा चित्रपटात असभ्य व अश्लिल भाषेचा प्रयोग करण्यात आला आहे. हा चित्रपट समाजाच्या नैतिक मूल्यांविरोधात आहे. त्यामुळे त्यावर बंदी लादली जावी, अशी मागणी हिंदू फ्रंट फॉर जस्टिस आपल्या याचिकेत केली आहे. या चित्रपटात सनी देओल, साक्षी तन्वर व रवि किशन यासारखे कलाकार आहे.