कबीर खानचा सलमानसोबतचा हा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘एक था टायगर’ या कबीरच्या दोन सिनेमात सलमान दिसला होता. ‘ट्यूबलाईट’ हा एक ऐतिहासिक वॉर ड्रामा आहे. सलमानच्या या चित्रपटात चीनी अभिनेत्री झू झू सुद्धा दिसणार आहे.सलमान यात चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एका चीनी अॅक्ट्रेससोबत रोमान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट १९६२ साली झालेल्या चीन युद्धावर आधारित असून सलमान खानचे पात्र एका चीनी मुलीच्या प्रेमात पडते अशी कथेची मांडणी सांगितली जातेय. सलमानचा भाऊ सोहेल खानसुद्धा यात दिसणार आहे. विशेष म्हणजे, शाहरूख खान यात एका कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.ALSO READ : चिमुकल्या आहिलला कडेवर घेऊन मामा सलमान खान नेमका चालला कोठे?सलमान तूर्तास आपल्या वर्ल्ड टूरमध्ये बिझी आहे. याशिवाय ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे शूटींगही तो करतो आहे. येथून परतल्यावर तो ‘ट्यूबलाईट’चे प्रमोशन करणार आहे.Kya tumhe yakeen hai ? Agar tumhe yakeen hai then 'Back his Back' . pic.twitter.com/XxQCrOFu6U— Salman Khan (@BeingSalmanKhan) 19 April 2017
सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’चे पोस्टर पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल,‘अरे पलट...’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 13:09 IST
सलमान खानच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस एक गोड बातमी घेऊन उगवला आहे. होय, सलमानच्या ‘ट्यूबलाईट’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे पहिले पोस्टर ...
सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’चे पोस्टर पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल,‘अरे पलट...’!!
सलमान खानच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस एक गोड बातमी घेऊन उगवला आहे. होय, सलमानच्या ‘ट्यूबलाईट’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे पहिले पोस्टर आज रिलीज झाले. काल दिग्दर्शक कबीर खान याने ‘ट्यूबलाईट’ची एक झलक दाखवली होती आणि आज सलमानने या चित्रपटाचे पहिले पोस्टर जारी केले. सलमानचे हे पोस्टर पाहिल्यावर तुम्हीही ‘पलट’ म्हटल्याशिवाय राहणार नाही. कारण, या पोस्टरमध्ये सलमान पाठमोरा दिसतोय. साईड बॅग, अंगात कोट, डोक्यावर टोपी अशा थाटात उगवणाºया सूर्याच्या दिशेने सलमान निघालेला आहे. यात सलमानचा चेहरा दिसत नाही. पण यावर एक टॅग लाईन मात्र दिसते. ‘क्या तुम्हे यकीन है,’ अशी ही टॅगलाईन आहे.