बघा, ‘वेटिंग’चा इमोशनल ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 18:58 IST
ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शहा आणि आपल्या प्रगल्भ अभिनयासाठी ओळखली जाणारी कल्की कोचलीन हे दोघेही एका चित्रपटात एकत्र दिसणार आहे. ‘वेटिंग’ असे या चित्रपटाचे नाव. आज शुक्रवारी ‘वेटिंग’चा ट्रेलर रिलीज झाला.
बघा, ‘वेटिंग’चा इमोशनल ट्रेलर
ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शहा आणि आपल्या प्रगल्भ अभिनयासाठी ओळखली जाणारी कल्की कोचलीन हे दोघेही एका चित्रपटात एकत्र दिसणार आहे. ‘वेटिंग’ असे या चित्रपटाचे नाव. आज शुक्रवारी ‘वेटिंग’चा ट्रेलर रिलीज झाला. दोघांचेही पार्टनर(नसीरची पत्नी आणि कल्कीचा पती) दोघेही कोमात जातात आणि दोघेही आपआपल्या पार्टनरला कोमातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, अशा समदु:खी व्यक्तिंची कथा म्हणजे हा चित्रपट आहे. ट्रेलरमधील कल्की व नसीरचा अभिनय दमदार तर दिसतो आहेच पण त्याला संवदनेची किनारही आहे. हा चित्रपट येत्या २७ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये येतो आहे, तेव्हा तूर्तास त्याचा इमोशनल ट्रेलर बघाच.