Join us

बघा: ‘टॅफिक’ ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 18:01 IST

मनोज वाजपेयी याची मुख्य भूमिका असलेल्या ‘टॅफिक’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आज बुधवारी आऊट झाला. 

मनोज वाजपेयी याची मुख्य भूमिका असलेल्या ‘टॅफिक’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आज बुधवारी आऊट झाला. इमोशनल-थ्रीलर  ‘टॅफिक’ हा एका मुंबई टू पुणे प्रवासातील एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. एका १३ वर्षांच्या चिमुकलीला हृदय प्रत्यारोपणातून जीवदान देण्यासाठी एक पोलिस कार एक जिवंत हृदय घेऊन मुंबईहून पुण्याला निघते,या थीमवर हा चित्रपट आधारित आहे. मनोज वाजपेयी, जिमी शेरगिल , दिव्या दत्ता, सचिन खेडेकर आदींच्या यात मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट याच नावाने आलेल्या एका मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. येत्या ६ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणे अपेक्षित आहे.