Join us

पहा ‘तेरा इंतजार’चे मोशन पोस्टर; प्रेमाच्या शोधात दिसतील सनी लिओनी अन् अरबाज खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 22:18 IST

अभिनेत्री सनी लिओनी आणि अरबाज खान स्टारर ‘तेरा इंतजार’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर आज रिलीज करण्यात आले. पोस्टरमधील सनीच्या चेहºयावरील भाव खूपच गंभीर दिसत आहेत.

अभिनेत्री सनी लिओनी आणि अरबाज खान स्टारर ‘तेरा इंतजार’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर आज रिलीज करण्यात आले. पोस्टरमधील सनीच्या चेहºयावरील भाव खूपच गंभीर दिसत आहेत. तर सलमान खानचा भाऊ अरबाज खान एका पेंटरच्या रूपात दिसत आहे. सनीच्या चेहºयावरील गंभीर भाव स्पष्टपणे सांगत आहेत की, चित्रपटात तिला कोणाचा तरी ‘इंतजार’ आहे. तर तो कदाचित अरबाजच असावा, असे अरबाजच्या चेहºयाकडे बघून वाटते. अमन मेहता आणि बीजल मेहता निर्मित हा चित्रपट एक रोमॅण्टिक म्युझिकल चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव वालिया यांनी केले आहे. पहिल्यांदाच अरबाज आणि सनीची जोडी पडद्यावर झळकणार असल्याने चाहत्यांना या चित्रपटाविषयी उत्सुकता  लागली आहे. सनीने नुकतेच बॉलिवूडमध्ये तिचे पाच वर्षं पूर्ण केले आहे. सलमान खान याच्या ‘बिग बॉस’ शोमधून भारतीय मनोरंजनसृष्टीत प्रवेश करणाºया सनीने अल्पावधीतच सुपरस्टारचा दर्जा मिळविला आहे. तर अरबाजही सनीबरोबर काम करण्यास उत्सुक आहे. त्याला या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. सनीविषयी सांगायचे झाल्यास ‘तेरा इंतजार’ व्यतिरिक्त सनी अजय देवगण स्टारर ‘बादशाहो’ या चित्रपटात इमरान हाश्मीबरोबर थिरकताना बघावयास मिळणार आहे. त्याचबरोबर संजय दत्तच्या ‘भूमी’ या चित्रपटातही सनी एक आयटम सॉँग करीत आहे. दरम्यान, हे पोस्टर रिलीज केल्यानंतर चाहत्यांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे निर्मात्यांच्या चित्रपटाविषयी अपेक्षा वाढल्या असतील यात काहीच शंका नाही. परंतु चित्रपट बॉक्स आॅफिसवर काय करिष्मा दाखवेल, हे रिलीजनंतर स्पष्ट होईलच.