बॅकलेस ब्लाऊजमध्ये पहा मलाईका अरोराचा स्टनिंग लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 18:14 IST
रॅम्पवर नेहमीच तारे-तारकांच्या सौंदर्याच्या अदा बघावयास मिळत असतात. मात्र जेव्हा मलाईका अरोरा रॅम्पवर उतरतेय तेव्हा सर्व वातावरणच बदलून जात ...
बॅकलेस ब्लाऊजमध्ये पहा मलाईका अरोराचा स्टनिंग लूक
रॅम्पवर नेहमीच तारे-तारकांच्या सौंदर्याच्या अदा बघावयास मिळत असतात. मात्र जेव्हा मलाईका अरोरा रॅम्पवर उतरतेय तेव्हा सर्व वातावरणच बदलून जात असते. लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर मलाईकाचा असा काही जलवा बघावयास मिळाला की, बघणारे थक्क झाले. लॅक्मे फॅशन वीकचा शेवटचा दिवस बॉलिवूड स्टार्सनी गाजविला. बॉलिवूडच्या अनेक तारे-तारकांनी रॅम्पवॉक करीत चार चॉँद लावले. मात्र खरी गंमत तेव्हा आली जेव्हा हॉट अॅण्ड सेक्सी मलाईका अरोरा रॅम्पवर उतरली. बॅकलेस ब्लाउजमध्ये मलाईकाचे सौंदर्य उठून दिसत होते. तिच्या अदा घायाळ करणाºया होत्या. मलाईकाप्रमाणेच शेवटच्या दिवशी करिना कपूर खान हिनेही मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रॅम्पवर उतरत आपला जलवा दाखविला होता. मात्र करिनानंतर आलेल्या मलाईकाच्या अदा उपस्थिताना जबरदस्त भावल्या. वास्तविक मलाईका नेहमीच रॅम्पवर उतरल्यानंतर चर्चेचा विषय ठरत असते. कारण तिचा अंदाज हा प्रत्येकालाच भावणारा असतो. यावेळेसदेखील मलाईकाने अशाच प्रकारे रॅम्पवॉक करून उपस्थितांची मने जिंकली. फॅशन डिझायनर दिव्या रेड्डीची शोस्टॉपर बनलेल्या मलाईकाने दिव्याचे साहबजादी कलेक्शन यावेळी सादर केले. रेड कलरचे बॅकलेस ब्लाऊज, येलो लहेंगा आणि मॅचिंग दुपट्टा परिधान करून रॅम्पवर उतरलेल्या मलाईकाचे सौंदर्य आणखीच खुलून दिसत होते. रॅम्पवर उतरताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या. या पोशाखात मलाईका एकदम स्टायलिश दिसत होती. तिचा अंदाज भावणारा होता. मलाईकाचे याच अंदाजातील पहा काही हॉट अॅण्ड सेक्सी फोटोज्...