Join us

SEE : ​‘ऐ दिल...’मधील शाहरुख-ऐश्वर्याचा फोटो लीक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 10:17 IST

करण जोहरच्या वादग्रस्त आणि बहुप्रतिक्षित सिनेमात शाहरुख कॅमिओ करणार, ही बातमी जेव्हापासून बाहेर आली तेव्हापासून त्याच्या भूमिकेविषयी तर्कवितर्क वर्तवले ...

करण जोहरच्या वादग्रस्त आणि बहुप्रतिक्षित सिनेमात शाहरुख कॅमिओ करणार, ही बातमी जेव्हापासून बाहेर आली तेव्हापासून त्याच्या भूमिकेविषयी तर्कवितर्क वर्तवले जात होते.रणबीर, ऐश्वर्या आणि अनुष्का स्टारर या चित्रपटात करणचा बेस्ट फ्रेंड शाहरुख येणार म्हटल्यावर चाहत्यांची ‘ऐ दिल’विषयी उत्सुकता आणखी वाढली होती.बऱ्याच वादविवादानंतर अखेर शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली. शॉकिंग म्हणजे एका चाहत्याने चित्रपटातील एक स्टील ट्विटरवर शेअर करून शाहरुखची पहिली झलक दाखवली. या फोटोत शाहरुख आणि ऐश्वर्या दिसतात तर रणबीर पाठमोरा उभा आहे.फोटोतील सबटायटल पाहून हा फोटो बहुधा विदेशातील थिएटरमध्ये काढला असावा. सध्या इंटरनेटवर हा स्टील प्रचंड व्हायरल होत असून लोक मोठ्या प्रमाणात तो शेअर करीत आहेत.‘जोश’ आणि ‘देवदास’नंतर सुमारे १५ वर्षांनंतर शाहरुख-ऐश प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसताहेत ही चाहत्यांसाठी खूप मोठी बाब आहे. हा फोटो पाहून तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा.