Join us

​पाहा :‘सुल्तान’मधील वादग्रस्त गाण्यात सलमान-अनुष्काचा रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 20:16 IST

होय, ‘सुल्तान’चे ‘जग घुमिया’ हे गाणे आज रिलीज झाले. राहत फतेह अली खान यांच्या आवाजातील या गाण्यात सलमान व अनुष्का शर्मा रोमान्स करताना दिसत आहेत.

होय, ‘सुल्तान’चे ‘जग घुमिया’ हे गाणे आज रिलीज झाले. राहत फतेह अली खान यांच्या आवाजातील या गाण्यात सलमान व अनुष्का शर्मा रोमान्स करताना दिसत आहेत. गाण्याचे बोल जितके सुंदर आहेत तितकाच राहत फतेह अली खान यांचा आवाजही मधूर आहे. या गाण्यावरून निर्माण झालेला वाद तुम्हाला ठाऊक आहेच. आधी या गाण्याला गायक अरिजीत सिंह यांने आपला आवाज दिला होता. मात्र सलमानसोबत अरिजीतचा वाद झाला. यानंतर अरिजीतने अनेकदा माफी मागूनही सलमान वितळला नाही.  यानंतर राहत फतेह अली यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले. सलमान ‘सुल्तान’मध्ये रेसलरच्या भूमिकेत दिसणार आहे. अनुष्कानेही रेसलरची भूमिका साकारली आहे. रणदीप हुड्डा यात सलमानचा कोच म्हणून दिसणार आहे. या चित्रपटाचे एक गाणे ‘बेबी को बेस पसंद है..’ आधीच रिलीज झाले असून लोकांनी डोक्यावर घेतले आहे. आता हेही गाणे पाहा तर...!!