Join us

पाहाच Rustom Title Track : ‘रूस्तम वहीं...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 18:04 IST

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या ‘रूस्तम’ या चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.‘रूस्तम’च्या पोस्टर्सपासून त्याचा रेडिओ ट्रेलर, ट्रेलरची सध्या जोरदार चर्चा आहे. सिनेमाचा प्रदर्शित ट्रेलर आणि गाणे चाहत्यांना भुरळ घालत असतानाच आज या सिनेमाचा टायटल ट्रॅक लाँच करण्यात आला.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या ‘रूस्तम’ या चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.‘रूस्तम’च्या पोस्टर्सपासून त्याचा रेडिओ ट्रेलर, ट्रेलरची सध्या जोरदार चर्चा आहे. सिनेमाचा प्रदर्शित ट्रेलर आणि गाणे चाहत्यांना भुरळ घालत असतानाच आज या सिनेमाचा टायटल ट्रॅक लाँच करण्यात आला.‘रुस्तम वही..’ असे बोल असणाºया या दोन मिनिटांच्या गाण्यात चित्रपटाचा थरार जाणवतो. अक्षय कुमार ‘रूस्तम’ या चित्रपटातून रुस्तम पावरी या नौदल अधिकाºयाची भूमिका साकारत आहे. स्वत: अक्षयने ट्विट करत त्याच्या चाहत्यांना ‘रूस्तम वही...’ या गाण्याबद्दल माहीती दिली. १९५९ च्या काळतील बहुचर्चित नानावटी केसच्या एका थरारक घटनाक्रमाची आठवण करून देणारेहे गाणे सुकृती कक्तर आणि राघव सचर यांनी स्वरबद्ध केले आहे.   टिनू सुरेश देसाईच्या दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, इलियाना डिक्रूज, एशा गुप्ता, अर्जन बाजवा, परमीत सेठी हे कलाकार झळकणार आहेत. तेव्हा पाहा तर..‘रुस्तम वही..’