Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PICS: जब ‘बेगम जान’विद्या बालन MET ‘उमराव जान’रेखा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 16:05 IST

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सध्या बेगम जान या आगामी सिनेमाबाबत बरीच उत्सुक आहे. रसिकांमध्येही विद्याच्या या भूमिकेविषयी उत्कंठा आहे. ...

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सध्या बेगम जान या आगामी सिनेमाबाबत बरीच उत्सुक आहे. रसिकांमध्येही विद्याच्या या भूमिकेविषयी उत्कंठा आहे. पुढच्या आठवड्यात हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. मात्र हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येण्याआधी रसिकांना अनोखं दृष्य पाहायला मिळालं.ते म्हणजे उमराव जान आणि बेगम जान एकत्र आल्याचं.हिंदी चित्रपटसृष्टीच्या उमराव जान अर्थात अभिनेत्री रेखा आणि बेगम जान म्हणजेच अभिनेत्री विद्या बालन यांची भेट घडून आली. नुकतंच विद्या बालनच्या आगामी 'बेगम जान' या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. मुंबईत आयोजित या स्पेशल स्क्रीनिंगला जणू अवघं तारांगण अवतरलं होतं. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी या स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी लावली. मात्र सा-यांचं लक्ष वेधून घेतलं ज्यावेळी तिथं आगमन झालं ते हिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री आणि बॉलिवूड दिवा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या अभिनेत्री रेखा यांचं. यावेळी बॉलिवूडच्या उमराव जान आणि बॉलिवूडची नवी बेगम जान विद्या बालन यांची भेट झाली.यावेळी रेखा आणि विद्या यांनी एकमेकांसोबत फोटोही काढले.दोघी एकत्र आल्यात म्हटल्यावर माध्यमांच्या कॅमे-यांची नजरसुद्धा आपसुकच तिथे वळली. यावेळी उमराव जान आणि बेगम जान यांनी बरीच धम्माल केली. दोघींही एकमेकांसोबत खुश दिसतायत. बेगम जान विद्याने हे सगळे फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केलेत. यावेळी तिने लिहलंय की उमराव जान आणि बेगम जान एकत्र. 'उमराव जान' आणि 'बेगम जान' यांच्यासोबत या स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी लावली ती अभिनेत्री आलिया भट हिनं. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींसोबत आलियानंही खूप धम्माल केल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय.तिघी एकमेकींची कंपनी एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळालं. 'बेगम जान' या सिनेमाची कथा भारत-पाकिस्तान फाळणीनंतरच्या बंगालवर आधारित आहे.1947 साली  फाळणीनंतर बेगम जानचं घर दोन भागात विभाजित झालं. घराचा काही हिस्सा भारतात तर काही पाकिस्तानात राहिला. सरकारी आदेशानंतरही बेगम जान आपलं घर सोडण्यास तयार होत नाही. त्यानंतर घर वाचवण्याचं आणि ते तोडण्याचा संघर्ष युद्धात बदलतो. या सिनेमात विद्याची भूमिका नीडर स्वरुपाची आहे. विद्यासोबत या सिनेमात नसिरुद्दीन शाह, आशीष विद्यार्थी, इला अरुण, रणजित कपूर, चंकी पांडे आणि गौहर खान पाहायला मिळणार आहेत.