सध्या बॉलिवूडमध्ये नव-नव्या जोडप्यांच्या प्रेमाची चर्चा आहे. अशीच एक जोडी म्हणजे सुश्मिता सेन व तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल. होय, सध्या सुश्मिता बिनधास्तपणे स्वत:पेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या या बॉयफ्रेन्डसोबत हातात हात घालून फिरतेय. अगदी अलीकडे शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत हे कथित कपल एकत्र दिसले. दोघांनीही मीडियाला अगदी बेधडक पोज दिल्या होत्या. आता सुश्मिता व रोहमन दोघेही प्रदीप गुहा यांच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले. दोघांनीही हातात हात घालून पार्टीत एन्ट्री घेतली.
यावेळी दोघांचीही केमिस्ट्री बघण्यासारखी होती.
२७ वर्षांचा रोहमन काही वर्षांपूर्वी मुंबईत शिफ्ट झाला आणि फार कमी वेळात देशातील लीडिंग फॅशन शोजमधील ओळखीचा चेहरा झाला. सध्या रोहमन फॅशन इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे.
४२ वर्षांची सुश्मिता रोहमनच्या प्रेमात आहे आणि हे रिलेशनशिप तिने जवळपास कन्फर्म केले आहे. रोहमनने सुश्मिताचं नाही तर तिच्या दोन्ही मुलींचीही मने जिंकली आहेत. अलीकडे सुशने मुलगी रिनीसोबतचा रोहमनचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.